अधिकाऱ्याची धडपड : स्वच्छता अभियानाला सुरूवात गोंदिया : रेल्वे स्थानक स्वच्छ व सुंदर दिसावे यासाठी दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे डी.एम.ई. प्रदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनात रेल्वे स्थानकावर स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. २६ मे रोजी या अभियानाचा श्रीगणेश करण्यात आला असून कर्मचाऱ्यांनीही स्वच्छतेची शपथ घेतली आहे. याप्रसंगी स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य अपूर्व अग्रवाल, लोको निरीक्षक गौतम चॅटर्जी, स्टेशन प्रबंधक एच.ए.चौधरी, वाणिज्य निरीक्षक अरविंद शाह, पर्यवेक्षक मुकेश कुमार, मनमोहन सिंह, आरोग्य निरीक्षक गगन गोलानी, नितीन शर्मा, एन.के.भोंडेकर, एल.बी.पटले, निर्मल अग्रवाल,रूपाली धकाते, संजय बागडे व अन्य अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी अग्रवाल यांनी कांबळे यांना महाराष्ट्र एक्स्प्रेस फलाट क्रमांक १ वरून सोडण्याचा विषय मंडळ प्रबंधक सचिन शर्मा यांच्या समक्ष मांडण्याची विनंती केली. या अभियानांतर्गत प्रत्येक फलाटावर लावण्यात आलेल्या कचरापेटींची तसेच प्रत्येक १० मिनिटांनी रेल्वे रूळांची सफाई केली जात आहे. विशेष म्हणजे रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेमुळे गोंदिया स्टेशन विदर्भात क्लीन स्टेशन म्हणून ओळखला जात आहे. (शहर प्रतिनिधी)आठवड्यातून एकदा श्रमदान स्वच्छता अभियानाच्या शुभारंभप्रसंगी रेल्वे स्थानकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून एकदा श्रमदान करण्याची शपथ घेतली. यासोबतच कांबळे यांनी सल्लागार समितीच्या सदस्यांसह स्टेशन परिसरातील विविध स्टॉल्स मधील खाद्यपदार्थांची तपासणी करून त्यांच्या गुणवत्तेचे निरीक्षण केले.
स्वच्छ रेल्वे स्थानकासाठी कर्मचाऱ्यांनी कसली कंबर
By admin | Published: June 04, 2016 1:35 AM