विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बेवारटोला सिंचन प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याचे काम अर्धवट आहे. परिणामी मागील २० वर्षांपासून दरेकसा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीला सिंचन व्हावे म्हणून बेवारटोला धरणातून एक डावा आणि दुसरा उजवा असे दोन कालवे जोडण्याचे काम सुरु करण्यात आले होते. परंतु उजवा कालवा रेल्वे विभागाच्या मंजुरीअभावी तर डावा कालवा वन कायद्याच्या कचाट्यात अडकल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.उजव्या कालव्याची लांबी ८ किमी प्रस्तावित असून हा कालवा टोयागोंदी चांदसुरज विचारपूर गावाकडे जाणार आहे. याचा लाभ जमाकुडो कोपालगड या गावातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. या कालव्याची विसर्ग क्षमता ०.९८ घन मिटर प्रति सेकंद एवढी नियोजित केलेली आहे. हा कालवा टोयागोंदी चांदसूरजपर्यंत तयार झाला असून आतापर्यंत फक्त ३ किमी बांधकाम पूर्ण झाले आहे. तर ५ किमीचे बांधकाम शिल्लक आहे. चांदसुरज-१ आणि चांदसुरज-२ या दोन्ही गावाच्या मधातून मुंबई ते हावडा रेल्वे मार्ग गेलेला आहे. उजवा कालवा रेल्वे मार्ग ओलांडून भूमिगत मार्गाने पुढे काढावा लागेल. यासाठी रेल्वे मंत्रालयाची मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय कालव्याचे काम पुढे करताच येणार नाही.दोन दशकापासून रेल्वेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्यात आले किंवा नाही याबाबत शंका आहे. धरण बांधताना कालव्याच्या अडचणीबद्दल गांभीर्याने प्रकरण हाताळण्याचे काम का करण्यात आले नाही असा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. डावा कालवा ६.२० किमी लांबीचा असून या कालव्यातून १.८६ घ.मी. प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग होणार असून या कालव्याचे काम बºयाच प्रमाणात पूर्ण झाले आहे. हा कालवा बंजारी डहाराटोला, धनेगाव, दलदलकुही, मुंशीटोला इत्यादी गावात सिंचन सोय करुन देणारा आहे. वन कायद्याच्या अडचणीने कालवा ज्या ठिकाणावरुन जातो त्या ठिकाणाहून न दाखविता दुसºयाच ठिकाणी दाखविण्यात आला. दलदलकुही गावाला या कालव्याचे पाणी मिळणार असल्याने येथील नागरिक व शेतकरी वन कायद्याची अडचण दूर करुन या गावाजवळून कालवा तयार करण्याची मागणी केली जात आहे.डाव्या कालव्यातून मागील दोन वर्षापासून बंजारी डहारटोला गावाला सिंचनासाठी पाणी देण्याचे प्रयोग करण्यात आले. परंतु कालवा पूर्ण झाला नसल्याने पाण्याचा अपव्ययच जास्त होता. एकंदरीत दोन्ही कालवे कायद्याच्या अडचणीत सापडले असून या अडचणी केव्हा दूर होतील याकडे परिसरातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.प्रकल्प मार्गी लावण्याचे आश्वासनयावर्षी फेबु्रवारी महिन्यात कचारगड यात्रेनिमित्त कोयापुनेम महोत्सवाच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी धनेगावला येथे आले होते. या वेळी येथील शेतकºयांनी बेवारटोला प्रकल्पाच्या मुद्दा उपस्थित करुन रेल्वेमुळे कालव्याचे बांधकाम रखडले असल्याची बाब केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या लक्षात आणून दिली. तेव्हा गडकरी यांनी रेल्वेची मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. तसेच यासाठी एका शिष्टमंडळाला दिल्ली येथे बोलविले होते.
रेल्वे आणि वनकायद्याच्या कचाट्यात अडकला प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2019 11:46 PM
तालुक्यातील महत्त्वाकांक्षी बेवारटोला सिंचन प्रकल्पाच्या दोन्ही कालव्याचे काम अर्धवट आहे. परिणामी मागील २० वर्षांपासून दरेकसा तालुक्यातील शेतकरी सिंचनापासून वंचित आहेत. शेतीला सिंचन व्हावे म्हणून बेवारटोला धरणातून एक डावा आणि दुसरा उजवा असे दोन कालवे जोडण्याचे काम सुरु करण्यात आले होते.
ठळक मुद्देबेवारटोला प्रकल्पाचे दोन्ही कालवे अर्धवट : दलदलकुहीला फटका, हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनापासून वंचित