अर्जुनी-मोरगाव : दुसऱ्या लाटेत जेव्हा ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा होऊन लोकांचे जीव जात होते, तेव्हा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी माणुसकीचे नाते जपत लगेच ऑक्सिजन व इंजेक्शनची सोय केली. भविष्यात ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी ऑक्सिजन प्लांटची कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात आली आहे. शेतकरी विकासाचा ध्यास घेऊन धान खरेदी केंद्र वाढवली व धानाला बोनस देण्यात आला. सर्वसामान्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. लोकांचा सर्वांगीण विकास व्हावा, हाच एकमेव संकल्प खासदार पटेल यांनी घेतला आहे. त्यामुळे काम करणाऱ्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आयोजित जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषद कार्यकर्ता बैठकीत ते बोलत होते. आमदार मनोहर चंद्रिकापुरे व जिल्हाध्यक्ष विजय शिवनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार चंद्रिकापुरे यांनी सांगितले की, मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकारने आणलेल्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांविरोधात देशाच्या राजधानीच्या वेशीवर हजारो शेतकरी आंदोलन करत आहेत. कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडे काही ठोस धोरण नसल्याचे सांगितले. यावेळी तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, किशोर तरोणे, यशवंत परशुरामकर, श्रीनारायण पालीवाल, नारायण भेंडारकर, राकेश लंजे, राकेश जयस्वाल, सुशीला हलमारे, योगेश काकडे, जमना शहारे, नरेश रंगारी, राजेंद्र जांभुळकर, माधुरी पिंपळकर, निर्मल ईश्वरे, वनिता शहारे उपस्थित होते.
-----------------------------
कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
जितेंद्र कापगते, माधुरी हुमे, कल्पना रणदिवे, सुशीला वैष्णव, वैशाली बोरकर, सविता कापगते, आशा केशलकर, प्रीती स्वामी, पिंटू स्वामी, आशा चांदेवार, मीरा चांदेवार, वैशाली वाघमारे, ललिता डोंगरे, कल्पना भैसारे, नाशिका बोरकर, राणी वाढई, स्नेहा नंदनवार, सुनीता भेंडारकर, सुनंदा शेंडे, वीना पुसतोडे, शंकुमाला चांदेवार, सुनीताताई हुमणे आदींनी पक्षात प्रवेश केला.