महाराष्ट्र शासन कोरोनाच्या एकाच कामात लक्ष वेधत आहे; परंतु गोंदिया-भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकर्यांनी उन्हाळी धानाची (रब्बी) लागवड केलेली असून, मे महिन्यात शेतकरी धानाची कापणी करून मळणी करणार आहेत. परंतु शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यासंबंधी अजून पावेतो शासनाचे आदेश प्राप्त झालेले नाही. तसेच शासनाने सोसायटीमार्फत खरीप हंगामाचे धान खरेदी केलेले असून खरेदी केंद्राचे गुदाम धानाने भरलेले आहेत.
आतापर्यंत शासनाची धान उचल करण्याची कार्यवाही झालेली नसून, शासन उदासीन दिसत आहे. तरी शासनाने सर्व गुदामातील धानाची उचल त्वरित करावी व उन्हाळी धान (रब्बी) खरेदीकरिता शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे, अशी मागणी माजी आमदार बंसोड यांनी शासनाला केली आहे.