कावराबांध येथे शुभारंभ : संजय पुराम, जिल्हाधिकारी काळे यांची उपस्थितीसालेकसा : महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची सुरुवात जिल्ह्यात कावराबांध येथे आमगावचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांची विशेष उपस्थिती होती.गुरूवार दि.१३ रोजी सालेकसा तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत दोन रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. पहिला रस्ता कावराबांध ते खेडेपार मार्ग आणि दुसरा रस्ता टोयागोंदी चौकी ते बोईरटोला मार्ग आहे. या मार्गासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तीन कोटी ८३ लाख मंजूर झाले. कावराबांध येथे रस्त्याचे भूमिपूजन जि.प.चे समाजकल्याण सभापती देवराम वडगाये यांच्या अध्यक्षतेत पार पडले. यावेळी आमदार संजय पुराम यांनी कुदळ मारुन पूजन केले.जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, तहसीलदार प्रशांत सांगळे, भाजप तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, माजी बांधकाम सभापती सविता पुराम, पं.स.सदस्य प्रमिला दसरिया, पं.स.सदस्य प्रतिभा परिहार, सरपंच मंजु बनोठे, कोटजमुरा येथील सरपंच बबिता मेश्राम, मेहतर दमाहे, शंकर मडावी, खेमराज लिल्हारे, मनोज बोपचे, दिनेश सुलाखे, अशोक सोनटक्के व इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.पुराम म्हणाले, ग्रामीण भागात रस्त्याची वाईट परिस्थिती असल्यास याचा विकासावर मोठा परिणाम होतो. म्हणून महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजना सुरु करुन प्रत्येक गावांना पक्क्या रस्त्याच्या माध्यमातून मुख्य मार्गाशी जोडण्याचे काम हाती घेतले आहे. जिल्ह्यात प्रथमच कावराबांध येथून या योजनेची सुरुवात होत आहे. आमगाव विधानसभा क्षेत्रात या योजनेचा पुरेपूर लाभ घेत गावांना पक्क्या मार्गाने जोडण्यात येईल. जिल्हाधिकारी डॉ.अभिमन्यू काळे म्हणाले, रस्ते ही माणसे जोडण्याचे काम करतात व विकास वाटेवर रस्त्याच्या विकासाशिवाय कोणाचाच विकास होऊ शकत नाही. त्यामुळे पक्के रस्ते हीच विकासवाटेची पहिली ओळख आहे. शासन त्या दिशेने प्रयत्नशील आहे. यावेळी समाजकल्याण सभापती देवराज वडगाये यांनी ही विकासाच्या बाबतीत अधिकारी, पदाधिकारी यांनी समन्वय साधून काम करावे असे आवाहन केले.प्रास्ताविक यादन नागपुरे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी बद्रीप्रसाद दसरिया, चमन हटवार, चैनसिंह मच्छिरके, जगन्नाथ परिहार, नेतराम मच्छिरके, व्यंकट उके, निर्मल उपराडे, पुरुषोत्तम चंदनकर, गुमानसिंह उपराडे, जागेश्वर दसरिया, आडकूदास माहुले, पुरण दसरिया, पुरण डहारे, झनक दमाहे, ईश्वर बनोटे यांचे सहकार्य लाभले. संचालन भाजप महामंत्री राजेंद्र बडोले यांनी तर आभार महामंत्री मनोज बोपचे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला सुरुवात
By admin | Published: October 14, 2016 2:13 AM