सडक-अर्जुनी : तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था कनेरी व चिखली येथील धान खरेदी केंद्र दोन दिवसांत सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रब्बी धान खरेदी केंद्र कोकणा येथील श्रीकृष्ण अवधूत आश्रम शाळेत फक्त १ दिवस सुरू करण्यात आले. सध्या धान खरेदी केंद्र बंद असल्यामुळे चिखली, कोकणा व कनेरी परिसरातील शेतकऱ्यांना फारच त्रास सहन करावा लागत आहे. आता पडक्या भावाने व्यापाऱ्यांना धान द्यावा लागत आहे. येत्या २ दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्यास रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नामदेव चुटे, कवडू ब्राम्हणकर, पतीराम सायम, ईश्वर कोरे, दाजीबा खोतेले, सुधाकर कुर्वे, अर्जुन घरोटे, शामराव कापगते आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.