लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला सन्मान योजना ‘नमस्ते दिदी’ या अभिनव योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्या तेजुकला गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रामुख्याने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शाम निमगडे, जिल्हा एनजीओ त्रिपाठी, तालुका वैद्यकीय अधिकारी राऊत, पं.स.सदस्या अर्चना राऊत, पं.स.सदस्य रामलाल मुगणकर, डॉ.पिंकू मंडल, चरण चेटुले, प्रकाश वलथरे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून आरोग्य सेविका गाडगे यांनी गर्भवती महिला सन्मान योजना नमस्ते दिदी ही योजना राबविणारी जिल्ह्यातील पहिलेच प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याचे सांगितले.सदर योजना ही गर्भवती महिलांशी संबंधीत असून गर्भवती महिलांच्या पोटात वाढणार बाळ हा देशाचे भविष्य असल्याचे सांगून आईच्या पोटात सुद्धा बाळ हसायला पाहिजे. हीच संकल्पना पुढे ठेवून प्रत्येक नागरिकांनी गर्भवती महिलांना सन्मान देणे गरजेचे असल्याचे सांगितले. डॉ. पिंकू मंडल यांच्या मार्गदर्शनाखाली या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सदर अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. बस स्थानक, रेल्वे स्टेशन, एटीएम, बाजार, दुकान, शौचालय, दवाखाना या सार्वजनिक ठिकणी गर्भवती महिला आढळल्यास सन्मानाने त्यांच्याशी व्यवहार करुन त्यांना प्रथम प्राधान्य दिल्यास या योजनेचे निश्चितच फलित होईल असे सांगितले. रमेश अंबुले यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील अडीअडचणी डॉ.पिंकू मंडल यांच्याकडून समजून घेतल्या.या ठिकाणी आवश्यक असलेल्या औषधीचा योग्य पुरवठा करण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे यांना दिले.आदिवासी व दुर्गम भागात असा उपक्रम राबविल्याबद्दल आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.डॉ.शाम निमगडे यांनी तालुक्यातच नव्हे तर गोंदिया जिल्ह्यात आरोग्य विषयक विविध नवीन-नवीन योजना राबविणारे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून केशोरीची ओळख असल्याचे सांगितले.
‘नमस्ते’ दिदी या अभिनव योजनेला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 9:38 PM
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवाडा कार्यक्रमाचे औचित्य साधून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात गर्भवती महिला सन्मान योजना ‘नमस्ते दिदी’ या अभिनव योजनेची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन जि.प.सदस्या तेजुकला गहाणे यांच्या अध्यक्षतेखाली जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती रमेश अंबुले यांच्या हस्ते करण्यात आले.
ठळक मुद्देगर्भवती महिला सन्मान योजना : पहिलेच प्राथमिक आरोग्य केंद्र