लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालय मंजूर होऊनही सध्या तहसील कार्यालयातूनच कामकाज सुरु आहे. सदर उपविभागीय कार्यालयासाठी प्रशस्त शासकीय इमारत सध्यास्थितीत उपलब्ध नसल्याने खासगी इमारतीसाठी शोधमोहीम सुरु आहे. मात्र हे उपविभागीय कार्यालय गावाच्या मध्यभागी स्थापन करण्यात यावे. या मागणीचे निवेदन तालुका काँग्रेस कमिटीतर्फे तहसीलदारांना देण्यात आले.गावाच्या लांब टोकावर असलेल्या बरडटोली येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाजवळील इमारतीमध्ये उपविभागीय कार्यालय स्थापित करून कामकाज सुरु करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही बाब उघड झाल्याने तालुक्यातील नागरिकांमध्ये संताप व्याप्त आहे. सर्वसामान्य जनतेला सोयीस्कर होण्याच्या हेतूने तहसील कार्यालयाजवळील कृषी उत्पन्न बाजार समिती व गावाच्या मध्यभागी उपविभागीय कार्यालयाचा कामकाज सुरु करण्यात यावे, अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आली.उपविभागीय कार्यालय सामान्य जनतेच्या हितासाठी ठरू शकेल, यासाठी गावाच्या मध्यभागी स्थापित करण्यात यावे, या एकमेव मागणीबाबत जिल्हाधिकाºयांच्या नावाने लेखी निवेदन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदार डी.सी. बोंबार्डे यांना देण्यात आले. अर्जुनी-मोरगाव तसेच सडक-अर्जुनी तालुका मिळून नव्याने उपविभागीय कार्यालयाची निर्मिती अर्जुनी-मोरगाव तालुक्यात झाली. तहसील कार्यालयाच्या शेजारीच असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशस्त कार्यालयात उपविभागीय कार्यालयाचा कारभार सुरु होणार होता. तोच न्यायालयीन प्रक्रियेने ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली.सुरूवातीपासूनच उपविभागीय कार्यालयाला ग्रहण लागत आहे. न्यायालयीन लढाईनंतर दोन्ही तालुक्यांचा भौगौलिकदृष्ट्या तुलनात्मक अभ्यास करता अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालयाला शासनस्तरावरुन मंजुरी देण्यात आली. तहसीलदारांकडेच बºयाच दिवसांपर्यंत कार्यभार सोपविण्यात आला. अलीकडेच उपविभागीय कार्यालयाला उपविभागीय अधिकारी लाभले. त्यांनी प्रभारही सांभाळला. सध्या तहसील कार्यालयामधूनच उपविभागीय कार्यालयाचा कार्यभार चालविला जात आहे. सदर कार्यालयासाठी प्रशस्त अशी स्वतंत्र शासकीय इमारत नसल्यामुळे अर्जुनी-मोरगाव नगरातील खासगी इमारतीची शासकीय स्तरावरुन चाचणी करण्यात आली.उपविभागीय कार्यालयासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जागा उपलब्ध करुन दिली जाईल, असा ठरावसुध्दा बाजार समितीच्या वतीने पारित करण्यात आला. पंचायत समिती कार्यालय तसेच गावाच्या मध्यभागी सोयीस्कर असलेल्या ठिकाणी जागा उपलब्ध असताना गावाबाहेर असलेल्या लांब पल्याच्या बरडटोली परिसरातील एका खासगी व्यक्तीच्या इमारतीमधील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या शेजारची जागा उपविभागीय कार्यालयासाठी भाडे तत्वावर घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी तालुक्यातील कोसो अंतरावरुन येणाºया सामान्य जनतेला जाण्या-येण्याच्या दृष्टीने गैरसोयीचे होणार आहे. शासकीय कार्यालयाजवळ कार्यालयाची इमारत न घेता हेतूपुरस्सर नागरिकांना त्रास होईल. उपविभागीय कार्यालय तहसील कार्यालयाच्या शेजारीच ठेवण्यात यावे, अशी मागणी काँग्रेस कमिटीने केली आहे. बरडटोली येथे उपविभागीय कार्यालय सुरु झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला. निवेदन देताना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, इंद्रदास झिलपे, नगर काँग्रेस अध्यक्ष अजय पशिने, लंजे, शहारे आदींचा समावेश होता.
समितीत कार्यालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2017 12:28 AM
अर्जुनी-मोरगाव येथे उपविभागीय कार्यालय मंजूर होऊनही सध्या तहसील कार्यालयातूनच कामकाज सुरु आहे.
ठळक मुद्देतालुका काँग्रेस कमिटीचे निवेदन : एसडीओ कार्यालयासाठी आंदोलनाचा इशारा