शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

तेलीटोला-मक्काटोला रस्त्याचे काम सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 10:28 PM

सालेकसा तालुक्यातील तेलीटोला-कडौतीटोला-मक्काटोला-वारकरीटोला या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. १९ जून २०१८ ला क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

ठळक मुद्देदोन महिन्यापूर्वी भूमिपूजन : गावकरी व विद्यार्थ्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सालेकसा तालुक्यातील तेलीटोला-कडौतीटोला-मक्काटोला-वारकरीटोला या रस्त्याच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. १९ जून २०१८ ला क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते सदर रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र दोन महिन्याचा कालावधीे लोटून अद्यापही कामाला सुरूवात झाली नाहीे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करताना गावकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता बांधकामाचे भूमिपूजन झाले मात्र बांधकाम केव्हा सुरू करणार असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला आहे.तेलीटोला-मक्काटोला मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तसेच कडौतीटोला ते मक्काटोला या मार्गावर खड्याबरोबरच रस्त्यावर पाणी साचून राहते. मक्काटोला येथे पुजारीटोला धरण आहे. अनेकवेळा धरण भरल्यानंतर रविवारला अनेक लोक धरणाला भेट देतात. शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी सदर मार्गाने ये-जा करतात. मात्र हा रस्ता पूर्णपणे खराब झाला असल्याने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. गावकऱ्यांनी या रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. त्यानंतर याची दखल घेत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतंर्गत या रस्ता बांधकामाला मंजुरी दिली. दोन महिन्यापूर्वीच या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन आ.पुराम यांच्या हस्ते करण्यात आले.रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी गिट्टी सुध्दा टाकण्यात आली. मात्र अद्यापही कामाला प्रत्यक्षात सुरूवात करण्यात आली नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून चिखल तयार झाले आहे. त्यामुळे या मार्गावरुन ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावकरी व विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेत रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी गावकºयांनी केली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा