शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
4
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
5
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
6
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
7
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
8
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
9
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
10
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
11
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
12
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
13
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
14
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
15
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
16
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
17
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
18
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित
19
कोस्टल रोडचा खर्च १३०० कोटींनी वाढला; एकूण खर्च गेला १४ हजार काेटींवर

स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाने पर्यावरण सप्ताहाला सुरूवात

By admin | Published: June 05, 2016 1:35 AM

गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पर्यावरण सप्ताह ३ ते ९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत आहे.

गोंदिया : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पर्यावरण सप्ताह ३ ते ९ जूनपर्यंत साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया येथे पर्यावरण सप्ताहाच्या प्रथम दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, अतिथी म्हणून शिंदे, युवराज कुंभलकर, डॉ. राजेंद्र जन, सुनील धोटे उपस्थितीत होते. जिल्हाधिकारी यांना सप्तपर्णीचे रोप देऊन सुनील धोटे यांनी स्वागत केले. डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पर्यावरणाचे रक्षण ही सर्वाची जवाबदारी आहे. यासाठी शासन वेळोवेळी विविध उपाय योजना करीत असते. स्वयंसेवी संस्था, पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग लाभल्यास यशस्वी वृक्ष लागवड करता येईल. त्याकरिता उपस्थित सर्व स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना पर्यावरण सप्ताहात सहकार्य करण्याचे आवाहन केले. ग्रामीण क्षेत्रासोबतच शहरेसुध्दा हिरवीगार झाली पाहिजेत. वृक्ष लागवड ही लोकचळवळ होणे काळाची गरज आहे, असे म्हणाले. युवराज कुंभलकर, सामाजिक वनीकरण यांनी राज्यात ५ जून पर्यावरण दिन साजरा होणार असल्याने त्यानिमित्ताने वृक्षारोपण, वृक्षसंगोपन, पर्यावरण प्रबोधन, प्रदूषण नियंत्रण इ. संदर्भात स्वयंसेवी संस्थांनी कार्यक्रम हाती घेण्याची विनंती केली. पर्यावरण सप्ताह कार्यक्रमास रुपेश निंबार्ते, हिरवळ संस्था, सुनील धोटे, नागझिरा फाऊंडेशन, लता वाजपेयी, सीमा वैसुले, सुजाता बहेकार, आधार महिला स्वयंसेवी संस्था, भावना दीपक कदम, नगरसेविका व लायन्स क्लब सिव्हील सदस्य, उमेंद्र भेलावे, अशोक पडोले, गोंदिया निसर्ग मंडळ, आर.जी. राय, गायत्री परिवार, युवा संयोजक, विवेककुमार बैस, अजय जायसवाल, राजेंद्र बग्गा, नीलम बग्गा, अतुल गुप्ता, पुरूषोत्तम मोदी, ए.एम. अघ, कुर्मराज चौव्हाण इत्यादी सवयंसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते. सुनील धोटे यांनी सुचविल्याप्रमाणे गोंदिया येथे कुडवा या स्थळी स्मृतिवन निर्मिती व्हावी. करिता जिल्हाधिकारी यांना विनंती केली आहे. उपस्थित स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमक्ष डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते सप्तपर्णीचे एक रोप लावण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन युवराज कुंभलकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)