लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे उपसा सिंचन विषयक कामांचा आढावा घेण्याकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये प्रामुख्याने विधानसभा क्षेत्रातील उपसा सिंचन विषयक कामांवर प्रकाश टाकण्यात आला. याप्रसंगी आमदार रहांगडाले यांनी योजनेवरील बंद पडून असलेले दोन पंप जून पर्यंत सुरू करण्याचे निर्देश दिले.बैठकीत योजनतील कालवे दुरुस्तीवर प्रकाश टाकत जे कालवे सध्या नादुरुस्त आहेत त्यांच्या दुरुस्तीच्या कामांचे प्रस्ताव त्वरीत शासनाकडे पाठविण्यात यावे तसेच दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात यावी. यावर्षी खळबंदा जलाशयात पाणी सोडल्यामुळे ४८० हेक्टर जमीन ओलाताखाली आलेली असून शेतकºयांना त्याचा फायदा झालेला आहे. टंचाई परिस्थिती पिण्याकरीता पाणी उपलब्ध करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्यात यावी व धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्र. २ चे बोदलकसा व चोरखमारा जलाशयात पाणी सोडण्याच्या कामाला लवकरात लवकर सुरुवात करण्यात यावी, त्यामुळे परिसरातील शेतकºयांना त्याचा लवकरात लवकर फायदा होईल. गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी, कटंगी मध्यम प्रकल्पांची कामे लवकरात लवकर सुरु करण्यात यावी अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ अ.वा.सुर्वे, मुख्य अभियंता कांबळे, अधिक्षक अभियंता नार्वेकर, मडामे, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, दाणी व इतर तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.
जूनपर्यंत होणार चारही पंप सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2017 9:29 PM
आमदार विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत कार्यकारी संचालक विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर येथे उपसा सिंचन विषयक कामांचा आढावा घेण्याकरीता बैठक आयोजित करण्यात आली होती.
ठळक मुद्देधापेवाडा उपसा सिंचन योजना : आ. रहांगडालेंनी घेतला योजनेतील कामांचा आढावा