शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

कार्याध्यक्षांना राज्य कमिटीचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 4:22 AM

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कुरघोड्या सुरू आहेत. कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबरोबर संघटनात्मक पदावर नियुक्त्या सुरू झाल्या. या नियुक्त्यांची ...

अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कुरघोड्या सुरू आहेत. कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबरोबर संघटनात्मक पदावर नियुक्त्या सुरू झाल्या. या नियुक्त्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दखल घेऊन नवनियुक्त कार्याध्यक्षांना दणका दिला आहे.

गोंदिया जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कुरघोड्यांचे सत्र सुरू आहे. यामुळे पक्षात गटबाजीला उधाण आले आहे. यापूर्वी गटबाजी होती. मात्र अलीकडे हे दोन्ही गट एकमेकांच्या कार्यक्रमात दिसून येत नाहीत. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने रत्नदीप दहिवले यांची जिल्हा कार्याध्यक्ष पदावर नियुक्ती केली. अशातच त्यांनी जिल्हाध्यक्षांची परवानगी न घेता अर्जुनी मोरगाव येथे संघटनात्मक पदावर नियुक्त्या केल्या. यासाठी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. नामदेव किरसान यांना अर्जुनी मोरगाव येथे येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली होती हे सर्वश्रुत आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी कार्याध्यक्षांना नियुक्तीचे अधिकार नसल्याचा खुलासा केला होता. या नियुक्त्यांच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे करण्यात आल्या. याची कमिटीने गंभीर दखल घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मोहन जोशी यांच्या स्वाक्षरीचे पत्र क्र. ४२५ शुक्रवारी येऊन धडकले. यात कोणत्याही नियुक्त्यांचे प्रस्ताव जिल्हाध्यक्षांमार्फत प्रदेश कार्यालयास सादर होणे अपेक्षित असते. अशा नियुक्त्यांसंदर्भात रीतसर प्रस्ताव जिल्हाध्यक्षांमार्फत प्रांताध्यक्षांच्या मान्यतेसाठी पाठवावा असे नमूद आहे. कमिटीने अशा प्रकारची सूचना करून कार्याध्यक्षांची चांगलीच गोची केली. जिल्ह्यात हे षडयंत्र रचण्यात एका आमदाराचा हात असल्याच्या चर्चा आहेत. खरेच जर त्यांचा हात असेल तर त्यांनाही ही चांगली चपराक समजली जाते आहे.