गोंदिया : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गोंदिया व देवरी येथील भरारी पथकाने आज (दि. ३) शनिवारला रोजी अवैध मोहफूल व देशी दारू विक्रीच्या अड्ड्यावर धाड घालून १५ गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणात १ लाख ४१ हजार ७६२ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग, गोंदिया ग्रामीण व शहरच्या दुय्यम निरीक्षकांनी भुराटोला येथे ३२० २२ देशी दारूच्या बाटल्या, टेकाबेदर येथून २५ देशी दारूच्या बाटल्या, भरारी पथकाने वडेगावातील निराधंना कोटांगले यांच्या घरून ६०० लिटर मोहफुलाचा सडवा व २५ लिटर मोहफुलाची दारू, तर हिवाकांता कोटांगले यांच्या घरुन ५००० लिटर मोहफुलाचा सडवा व ३० लिटर मोहफुलाची दारू असा १ लाख ४१ हजार ७६२ रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनात १५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अवैध दारू अड्ड्यावर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:30 AM