शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

नवाटोला वन समितीला राज्यस्तरीय पुरस्कार

By admin | Published: July 05, 2017 12:37 AM

तालुक्यातील प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळाचा समावेश असलेल्या नवाटोला परिसरात काम करणाऱ्या ...

वनमंत्र्यांच्या हस्ते सत्कार : ना.फडणवीस व गडकरींकडून गौरवोद्गारलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील प्रसिद्ध नैसर्गिक पर्यटनस्थळाचा समावेश असलेल्या नवाटोला परिसरात काम करणाऱ्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीला वन संरक्षण आणि संवर्धनाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल मुंबई येथील वन महोत्सवात राज्यस्तरीय पुरस्काराने सम्मानित करण्यात आले. राज्य स्तरीय पुरस्कार प्राप्त करणारी नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समिती ही या पुरस्काराची मानकरी ठरणारी जिल्ह्यातील प्रथमच समिती ठरली आहे.२०१५-१६ या वर्षात मोलाची कामगिरी केल्याबद्दल नवाटोला वन समितीने जिल्हा पातळीवरील प्रथम क्रमांक पटकावला होता. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते समितीला ५१ हजार रुपयाचे प्रथम बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर समितीने आपल्या कामगिरीत उत्साहपूर्वक वृद्धी करीत वनांची कत्तल थांबविणे, वृक्षारोपण करने, वनांचे सौंदर्य वाढविणे, अतिक्रमण हटविणे इत्यादी बाबतीत अनेक उल्लेखनीय कामे केली होती. या कामांचा आढावा घेण्यासाठी संत तुकाराम वन ग्राम योजनेंतर्गत राज्यस्तरीय तपासणी चमूने नवाटोला वन परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली व समितीने केलेल्या कामांचे मूल्यांकन केले. तपासणी चमूमध्ये विभाग व राज्यस्तरावरील वनविभागात कामे करणारी व्यक्ती व वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे कार्य पाहून कौतूक केले होते. त्यावेळी सकारात्मक प्रतिसाद मिळाले होते. त्यावेळी पुरुष वन व्यवस्थापन समितीसह महिला दक्षता समितीनेही आपल्या कामगिरीची माहिती सादर केलेली होती. राज्यात चार कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाला शुभारंभ आणि वन महोत्सवाचे औचित्य साधून मुंबई येथे कांडलवन संधारण केंद्रात आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भुपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे वन व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संयुक्त वन व्यवस्थापन समिती नवाटोलाच्या अध्यक्ष, सचिव आणि सदस्यांना दीड लाखांचा राज्यस्तरावरील तृतीय पुरस्कार स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी सत्कार सोहळ्यात ईशा फाऊंडेशनचे सचिव विकास खरगे, राज्य शासनातील वरिष्ठ अधिकारी, वन विभागातील मान्यवर आणि वन संवर्धन आणि संरक्षणाच्या क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावणारे अनेक मान्यवर आणि स्वयंसेवी व्यक्ती उपस्थित होते.मुंबई येथील सत्कार सोहळ्यात बक्षीस स्विकारण्यासाठी संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामदीन उईके, सचिव (वनरक्षक) सुरेश रहांगडाले, सदस्य रेवल उईके, ओमकार दसरिया, रामसिंग मडावी असे पाच लोक मुंबईला गेले होते. त्यांना १ जुलै रोजी १ ते ७ जुलैच्या वन महोत्सव कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी गौरविण्यात आले. पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्ह्याचे उपवनसंरक्षक एस. युवराज, तालुक्याचे वनपरिक्षेत्राधिकारी सदानंद अवगान यांच्यासह अनेकांनी आनंद व्यक्त करित गौरवोद्गार काढले.समितीने मानले ‘लोकमत’चे आधारहाजराफॉल नैसर्गिक पर्यटन स्थळाबद्दल ‘लोकमत’ वर्तमानपत्राने वेळोवेळी बातम्या आणि फोटो प्रसिद्ध करुन हाजराफॉल पर्यटन स्थळाला सतत प्रकाश झोतात ठेवले. त्याचबरोबर चित्रफितीच्या माध्यमातून सुद्धा ‘लोकमत’ने हाजराफॉल’ला देश विदेशात ओळख मिळवून दिली. एवढेच नाही तर हाजराफॉल परिसरात सतत मेहनत घेणाऱ्या युवक-युवतींनी करीत असलेल्या कामाची सुद्धा दखल घेत त्यांना सतत प्रसिद्धी दिली. त्यामुळे हाजराफॉल आणि वन व्यवस्थापन समितीचे कार्य पर्यटकांबरोबरच शासन-प्रशासनाच्या दरबारी गेले. याची दखल सुद्धा घेण्यात आली. ‘लोकमत’मध्ये सतत बातम्या आणि फोटो प्रकाशित केल्याबद्दल समितीचे अध्यक्ष रामदीन उईके, सचिव सुरेश रहांगडाले आणि समितीचे सदस्य युवक-युवतींनी ‘लोकमत’ वर्तमानपत्र आणि लोकमतचे सालेकसा तालुका प्रतिनिधी विजय मानकर यांचे आभार मानले.