लोकमत न्यूज नेटवर्कपरसवाडा : तिरोडा तालुका जि.प.लघूृ पाटबंधारे विभाग अंतर्गत तालुक्यातील काही गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याने अल्पावधीत या कामांची पार वाट लागली आहे. त्यामुळे या कामांची सखोल चौकशी केल्यास मोठा घोळ पुढे येण्याची शक्यता आहे.खैरलांजी येथे मामा तलावचे गेटचे काम तीन ठिकाणी करण्यात आले. मात्र त्यावर गेटच लावण्यात आले नाही. त्यामुळे संपूर्ण पाणी गेटमधून बाहेर गेल्याने तलाव कोरडे पडले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना या तलावाचा कुठलाच उपयोग होत नाही. लघू पाटबंधारे तलाव क्रं. १ परसवाडा जोड पाट असून त्यांचे सुध्दा काम निकृष्ट करण्यात आले. अर्धवटच काम करुन पिचिंग बरोबर न करता गेट लिकेज असल्याने पाणी वाहून जात आहे. संपूर्ण गेट पाळीच्या आत गेले आहे. जुन्या गेटपेक्षाही नवीन गेटचे काम निकृष्ट करण्यात आले आहे. पाटचाऱ्याचे काम योग्य न केल्यामुळे कालव्याने पाणी बरोबर जात नाही. लघू पाटबंधारे क्रमांक २ खैरलांजी येथील डाक बंगल्याच्या खाली खैरबंदा जलाशयाच्या कालव्यावर असून ते काम सुध्दा योग्य करण्यात आले नाही. ज्याठिकाणी ओव्हरफ्लो देण्यात तिथून पाणी वाहून जाण्याची शक्यता कमी आहे. तळ्याची पाळ खाली असून, पाळ फुटून जाणार पण ओव्हरफ्लो होणार नाही अशी या तलावाची स्थिती आहे. नाल्यावर बंधारा तयार करण्यात आला होता. त्याला दीड फूट तोडण्यासाठी व दुरूस्तीसाठी २ लाख १६ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला. हा खर्च सुद्धा पाण्यात गेला आहे.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत नाला सरंक्षण भिंत सरळीकरणाची कामे लघू पाटबंधारे विभागानेच केली आहे. ज्या ठिकाणी बंधारा तयार करण्यात आला. त्या बंधाºयात पाणी राहत नाही. लाखो रुपयांचा निधी खर्च करुन जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली. मात्र या कामांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होण्याऐवजी कंत्राटदारांना अधिक होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य मनोहर बुध्दे यांनी केली आहे. लघू सिंचन विभागाचे शाखा अभियंता चौधरी यांच्याशी संपर्क साधला असता. गेट लिकेज सुक्ष्म असून कंत्राटदाराला दुरुस्तीसाठी सांगण्यात आले असल्याचे सांगितले.पारदर्शकतेवर प्रश्नचिन्हराज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियानातंर्गत कामात घोळ होऊ नये, यासाठी काम सुरू असलेल्या ठिकाणाचे जीओ टॅगिंग व संकेत स्थळावर फोटो अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. मात्र यानंतरही जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या कामात घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 9:59 PM
तिरोडा तालुका जि.प.लघूृ पाटबंधारे विभाग अंतर्गत तालुक्यातील काही गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली. मात्र ही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आल्याने अल्पावधीत या कामांची पार वाट लागली आहे.
ठळक मुद्देगेट, पाटचारा, सुरक्षा भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे : चौकशीची मागणी