शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
2
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
3
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
4
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
5
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
6
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
7
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
8
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
9
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
10
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
11
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
12
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
13
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
14
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
15
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
16
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
17
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
18
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
19
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
20
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग

रुग्णाच्या पत्नीची डॉक्टरकडून छेडछाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 10:24 PM

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या पत्नीचा डॉक्टरने गाल व हात पकडून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रुग्ण व रुग्णाच्या पत्नीला मारहाण केली. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना बुधवारी (दि.१२) मध्यरात्री घडली.

ठळक मुद्देग्रामीण रुग्णालयातील प्रकार : रुग्ण व त्याच्या पत्नीला मारहाण, डॉक्टर बघेले यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या पत्नीचा डॉक्टरने गाल व हात पकडून विनयभंग केला. तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने रुग्ण व रुग्णाच्या पत्नीला मारहाण केली. वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी संतापजनक घटना बुधवारी (दि.१२) मध्यरात्री घडली. या घटनेने महिला रुग्ण व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तक्रारीवरुन डॉ.नेपालसिंग बघेले यांच्यावर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.प्राप्त माहितीनुसार बरडटोली येथील एका रुग्णाला भोवळ येत असल्याने त्याला बुधवारी दुपारी सुमारे ३ वाजता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात भरती केले. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत कार्यरत असलेले डॉ. नेपालसिंग बघेले हे रात्रपाळीत कर्तव्यावर होते. रुग्णासह त्याची पत्नी ही सुश्रृषेसाठी रुग्णालयातच होती. रात्री ११ वाजतादरम्यान डॉक्टरने मी काही मदत करु काय अशी विचारणा रुग्णाच्या पत्नीला केली. तीने मदतीची आवश्यकता नसल्याचे सांगितले. डॉ. बघेले यांनी रुग्णाची तपासणी केली व रक्ताची कमतरता असल्याचे सांगितले. डॉक्टरने रात्री ११.३० वाजताच्या सुमारास रुग्णाचे पत्नीला बाहेर येण्यास सांगितले. तिचे नाव गावाविषयी तिला विचारणा केली व जवळ ये असे म्हणाला. रुग्णालयाबाहेर सामसूम असल्याने तिला भिती वाटली. त्यामुळे ती थेट वार्डात पतीच्या बिछाण्यावर आली व झोपी गेली. ती झोपली असताना डॉ. बघेले तिच्याजवळ आले व तिचे गाल पकडले. ती जोरात ओरडली. तेव्हा डॉ. तिचे पतीचे बेडकडे गेला व त्याला हात लावला. तो घाबरुन उठला. तेव्हा डॉक्टरने रुग्णाच्या थोबाडीत हाणले. रुग्णालयातील कर्मचारी तिचेजवळ गोळा झाले व डॉक्टरची समजूत घातली. डॉक्टर ऐकत नव्हते.त्यांनी आपला मोर्चा रुग्णाच्या पत्नीकडे वळविला व तिच्याही गालपटावर लगावले असा संतापजनक व तेवढाच वैद्यकीय पेशाला अशोभनिय असा प्रकार येथे घडला आहे.गुरुवारी (दि.१३) सकाळी याची माहिती मिळताच शिवसैनिकांनी रुग्णालयावर धावा बोलला. डॉक्टरला आमचे समोर हजर करा व त्याचेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ.अकिनवार यांचेकडे केली.डॉ. बघेले यांना रुग्णालयातील कर्मचाºयांनीच पळून जाण्याची सवड दिल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला. यापूर्वी सुद्धा याच डॉक्टरचे किस्से गाजले आहेत. त्या डॉक्टराला या रुग्णालयात ठेवणार नसल्याचे आश्वासन डॉ.अकिनकर यांनी दिले. रुग्णाच्या पत्नीच्या लेखी तक्रारीवरुन अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्यात डॉ. नेपालसिंग बघेले यांच्याविरुद्ध भादंवि ३५४ अ, ३२३ कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक शिवराम कुंभरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बुराडे हे तपास करीत आहेत.हकालपट्टी करण्याची शिवसैनिकांची मागणीस्थानिक ग्रामीण रुग्णालय हे सदैव चर्चेत असते. अनेकदा कुठला ना कुठला तरी प्रकार येथे घडतच असतात. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनवार हे आठवड्यातून एखादे दिवशी येतात अशी तक्रार नित्याचीच आहे. या घटनेच्या निमित्ताने महिला रुग्ण व महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या रुग्णालयात संगणक आॅपरेटर म्हणून धिरज शेंडे हे कार्यरत आहेत. ते रुग्ण व त्यांचे नातेवाईकांशी असभ्य वर्तणूक करतात. कोणत्याही कामासाठी गेले असता अरेरावीने बोलणे व कामाविषयी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला असून त्याची तातडीने हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.ग्रामीण रुग्णालयाने केली तक्राररुग्णालयात दाखल असलेल्या रुग्ण त्याची पत्नी यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविल्यानंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अकिनकर यांनीही याप्रकरणी चौकशी करण्याचे पत्र पोलीस निरीक्षकांच्या नावे दिले आहे. यात डॉ. बघेले हे रुग्णालयात नेहमी मद्यप्राशन करुन कार्यरत कर्मचाºयांसोबत गैरवर्तणूक करीत असल्याची तक्रार केली आहे.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल