लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासीय व वाहन चालक चांगलेच त्रस्त आहेत. खड्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे. हा प्रयोग मात्र शहरवासीयांच्या त्रासात भर घालणारा ठरत आहे. मलम्यामुळे रस्त्यांची स्थिती अधिकच खराब झाली आहे. त्यावरून वाहने चालविणे अधिक धोकादायक ठरत आहे.शहरातील रस्त्यांना ग्रहण लागले असून अवघ्या शहरातीलच रस्त्यांची स्थिती गंभीर आहे. एखाद्या गावातील रस्त्यांपेक्षाही शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था शहरातील रस्त्यांची झाली आहे. अवघे रस्तेच उखडल्याचे दिसत असताना कित्येक रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या दुर्गतीमुळे पावसाळ््यात तर शहरवासीयांना आपला जीव मुठीत घेऊनच घराबाहेर पडावे लागत आहे. मात्र यावर उपाय योजना करण्याकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावरील या खड्ड्यांना भरण्यासाठी रस्त्यांची दुरूस्ती करण्याचे सोडून सध्या त्यावर मलम्याचा मुलामा चढविला जात आहे. गिट्टीचा कच्चा मसाला तयार करून उखडलेल्या रस्त्यांवर टाकण्याचे सौजन्य सध्या दाखविण्यात आले. शहरवासीयांचा त्रास कमी होणार हा यामागील हेतू दिसून येतो. मात्र या प्रयोगामुळे शहरवासीयांचा त्रास जास्तच वाढला आहे. पावसामुळे या मलम्यातील मसाला तर वाहून गेला. मात्र गिट्टी पडून असल्यामुळे जास्तच झटके वाहन चालकांना सहन करावे लागत आहे. काही ठिकाणी तर मलम्यामुळे चिखल तयार झाले असून तेथून वाहन काढणेही जिकरीचे झाले आहे. रस्त्यांमुळे झटके खात शहरवासीयांचे आता कंबरडे मोडण्याची पाळी आली आहे. मात्र येथील नेतेमंडळी शहर बदलत चालल्याचे बोलत आहेत. एखाद्या खेड्याच्या तुलनेत गोंदिया शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र यावर तोडगा काढणे सोडून मलमा टाकून हातवर करण्याचा प्रकार नगर परिषदेकडून दरवर्षी केला जात आहे.तेवढ्या पैशांत एखादा रस्ता तयार कराशहरातील रस्त्यांवरील खड्डे भरण्याच्या कामावर नगर परिषद व सार्वजनिक बांधकाम विभाग लहान-सहान कामे काढून पैसा खर्च करते. काही दिवसांनी समस्या जैसे थे होते. यामुळे पैश्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामावर पैसा खर्च करण्यापेक्षा तेवढ्याच पैशांत एखादा रस्ताच तयार करून टाका असा सूर शहरवासीयांचा आहे.
शहरातील रस्त्यांना मलम्याचा मुलामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:13 AM
अवघ्या शहरातीलच रस्त्यांची दयनिय अवस्था झाली असून त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे शहरवासीय व वाहन चालक चांगलेच त्रस्त आहेत. खड्यांचा त्रास कमी व्हावा, यासाठी या खड्डयांत मलमा टाकला जात आहे.
ठळक मुद्देखड्डे भरण्यासाठी प्रयोग : शहरवासीयांच्या त्रासात भर