शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
3
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
4
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
5
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
6
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
7
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
8
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
9
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
10
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
11
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
12
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
13
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
14
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
15
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
16
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
17
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
18
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
19
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...

सभापतींची तानाशाही थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 12:16 AM

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागाच सभापती आपल्या मनमर्जीने तानाशाही करून काम करीत आहेत. शिवाय आदर्श आचार संहितेचे त्यांच्याकडून उल्लंघन होत असल्याने त्यांची तानाशाही थांबविण्यात यावी. अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.पाण्याच्या टँकरला घेऊन कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक भागवत मेश्राम व पाणी पुरवठा ...

ठळक मुद्देपाणी टँकरचा वाद चिघळला : कॉंग्रेस नगरसेवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नगर परिषदेतील पाणी पुरवठा विभागाच सभापती आपल्या मनमर्जीने तानाशाही करून काम करीत आहेत. शिवाय आदर्श आचार संहितेचे त्यांच्याकडून उल्लंघन होत असल्याने त्यांची तानाशाही थांबविण्यात यावी. अशी मागणी कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.पाण्याच्या टँकरला घेऊन कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक भागवत मेश्राम व पाणी पुरवठा विभागाचे सभापती दीपक बोबडे यांच्यात वाद झाला होता. सभापती बोबडे यांनी मेश्राम यांच्या प्रभागात पाण्याचे टँकर पाठवू नये, असे अदेश विभागातील परिचराला दिले होते. तेव्हापासून कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक व सभापती बोबडे यांच्यात वाद सुरू आहे.दरम्यान, कॉँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी सभापती बोबडे यांच्या कामकाजाबाबत थेट जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे. निवेदनात, १६ फेब्रवारी रोजी सभापतींच्या निवडणुका पार पडल्या असून आतापर्यंत किमान तीन सभा घेणे अपेक्षित होते. जेणे करून आवश्यक कामांना मंजुरी देता आली असती. मात्र सभापतींनी एकही सभा घेतली नाही व सभा न घेताच व विषय पारित न करता कामे करीत आहेत. शिवाय कामांतही पक्षपात केला जात आहे.उन्हाळा लक्षात घेत लोकांना बोअरवेलवर अवलंबू रहावे लागते. मात्र यंदा बोअरवेल दुरस्तीच्या निविदा काढण्यात आली, नसून अन्य कोणत्याही प्रकारच्या निविदा झालेल्या नाहीत. तरीही सभापती जुन्याच दराने आपल्या लोकांच्या कामांचे कार्यादेश काढत असल्याचेही निवेदनात नमूद आहे. एवढेच नव्हे तर जिल्ह्यात २६ एप्रिल रोजी आचारसंहिता लागू होऊनही पाणी पुरवठा विभागाकडून अनेक प्रकारच्या निविदा बोलाविल्या जात असून ते नियमानुसार अवैध आहे. एकंदर सभापती आपल्या मनमर्जीने कामकाज करीत असून जनतेच्या पैशांची उधळण करीत असल्याचे निवेदनात नमूद असून यावर त्वरीत रोक लावण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना बांधकाम समिती सभापती व गटनेता शकील मंसूरी, माजी नगरसेवक राकेश ठाकूर, नगरसेवक क्रांती जायस्वाल, भागवत मेश्राम, पराग अग्रवाल, देवा रूसे उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस