लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमीक महासंघाच्यावतीने १० सप्टेंबर पासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू आहे.या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय देखील सहभागी झाली आहेत. संपुर्ण राज्यात १३०० विना अनुदानीत उच्च महाविद्यालय आहेत. त्यात २२ हजार ५०० शिक्षक गेल्या १५ ते १८ वर्षांपासून सेवा देत आहेत.यापैकी आतापर्यंत अनेक शिक्षक रु पयांचे सुद्धा वेतन न घेता सेवानिवृत्त झाले आहेत. अनेक शिक्षकांना असाध्य आजारांनी जकडले आहे. वेतन नसल्याने नोकरी असूनही लग्न झालेले नाही. राज्य शासनाकडे अशा विनाअनुदानीत उच्च माध्यमीक विद्यालयांचे १२०० अनुदान पात्र प्रस्ताव आहेत.त्यापैकी १२३ महाविद्यालय आणि २३ अतिरीक्त तुकड्यांना १८ फेब्रुवारी रोजी शासनाने अनुदान घोषीत केले. त्यांना २० टक्के वेतनाची घोषणा शासनाने ५ सप्टेंबर रोजी केली. उर्वरीत ११५० महाविद्यालय आणि हजारो शिक्षकांवर अन्याय झाला आहे. विनाअनुदानीत महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत वेतनाच्या मागणीकरिता दोन हजार १० आंदोलने केली. राज्यातील उर्वरीत महाविद्यालयांना देखील १०० टक्के अनुदान विनाविलंब देण्यात यावा, या मागणीकरिता राज्य पातळीवर सुरू असलेल्या संपाला जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी पाठिंबा दिला असून १० सप्टेंबर पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनगेल्या कित्येक वर्षांपासून विनावेतन काम करणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांना तातडीने वेतनाची तरतूद करण्यात यावी. या मागणीला घेवून जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमीक महाविद्यालयांतील शिक्षकांनी मंगळवारी (दि.११) जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेवून त्यांच्यापुढे गाऱ्हाने मांडले. यासंबंधीचे निवेदन त्यांना यावेळी संघटनेच्यावतीने देण्यात आले. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमीक कृती समितीचे अध्यक्ष कैलाश बोरकर, व्ही. आर. पोंगळे, डी.सी. कटरे, डी.डी. बोपचे, एम. आर. शहारे, कु. जी. वाय. पटले, कु. जे.बी. पटले, एस. वाय. लिल्हारे, एस.बी.रंगारी, जी. एम. खैरे, एम. डी. पटले आदींचा समावेश होता.
विना अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 9:13 PM
महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमीक महासंघाच्यावतीने १० सप्टेंबर पासून बेमुदत शाळाबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गोंदिया जिल्ह्यातील सर्व विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालय देखील सहभागी झाली आहेत.
ठळक मुद्देराज्यस्तरीय आंदोलन : १० सप्टेंबरपासून झाली सुरूवात