लोकमत न्यूज नेटवर्कसुकडी (डाकराम) : तिरोडा तालुक्यामध्ये दोन दिवसांपासून सतत वादळी पाऊस व गिरपिट झाल्याने अनेक गावांतील घर, गोठे व दुकानांचे छत उडाले. तसेच शेतातील झाडे, विद्युत तार व खांब पडले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.शनिवारी (दि.१४) सायंकाळपासून तर रात्री ३ वाजतापर्यंत पाऊस, वारा व वादळासह काही ठिकाणी बारीक गारपिट झाली. या पावसाने तिरोडा तालुक्यातील ग्राम डोंगरगाव (खडकी) येथील गजानन रुदा कटरे यांच्या घराचे संपूर्ण टिनाचे छत उडाले. त्यामुळे त्यांच्या घरी असलेले तांदूळ व धानाच्या पोती तसेच झोपण्याचे साहित्य पूर्णपणे ओले झाले. ही घटना रात्री २ वाजताच्या सुमारास घडली.सुदैवाने घरी कुणीच नव्हते, सर्व लग्नाला गेले होते. त्यामुळे जिवीत हानी टळली. घरावरील टिनाचे छत मागील बाजूला १५० फूट अंतरावर फेकल्या गेले. त्यामुळे गजानन कटरे यांच्या घराचे अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे.या घटनेची माहिती तिरोडा तालुका काँग़्रेसचे उपाध्यक्ष सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा सोसायटी संघटनेचे अध्यक्ष शिशुपाल पटले यांनी तहसीलदार संजय रामटेके यांना व तलाठ्यांना दिली. याशिवाय गावातील खेलन चुडामन बोपचे, मालन केशोराव बिसेन, खुशाल बारसागडे, खेमराज कटरे, महादेव रहांगडाले यांच्या घरांचे छत उडून नुकसान झाले आहे. सदर नुकसानीची भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी शिशुपाल पटले यांनी केली आहे.
वादळी वाऱ्याने घराचे छत उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 8:55 PM
तिरोडा तालुक्यामध्ये दोन दिवसांपासून सतत वादळी पाऊस व गिरपिट झाल्याने अनेक गावांतील घर, गोठे व दुकानांचे छत उडाले. तसेच शेतातील झाडे, विद्युत तार व खांब पडले. त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : तांदूळ व धानाचे पोते भिजले