शहरातील बाजारपेठ, बँक, शासकीय कार्यालयांमध्ये नेहमी वर्दळ असते. मुख्य बाजारपेठ असल्याने मोठ्या वाहनांची ये-जा असते. शहरातील मुख्य मार्ग, रेल्वे स्टेशन, रेल्वे गेट, आस्वाद चौक, तहसीलदर, उपविभागीय अधिकारी वीज वितरण कार्यालय आहे. या मार्गावर १५ ते २० मोकाट जनावरांचा वावर असतो. कित्येकदा ही जनावरे तासनतास मुख्य रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून असतात. यामुळे दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा परिस्थितीत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील गोपालक जनावरांना मोकाट सोडतात. जनावरांना मोकाट सोडू नये. यापुढे रस्त्यावर ही मोकाट जनावरे आढळून आल्यास त्यांना जप्त करून गोपालकांवर फौजदारी गुन्हे मागणी शहरवासीयांनी केली आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
रस्त्यावर मोकाट जनावरांचा वावर, मालकांवर कारवाई करा ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:20 AM