लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : गोंदिया-भंडारा जिल्ह्यात खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात विविध विकास कामे करण्यात आली. शैक्षणिक सुविधा, सिंचन, पर्यटन क्षेत्रात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे ही सर्व विकास कामे जनतेपर्यंत पोहचवून व जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेवून राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करण्याचे आवाहन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य राणा पाटील यांनी केले.अर्जुनी मोरगाव येथे राष्ट्रवादी युवक व विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, किशोर तरोणे, केतन तुरकर, युनूस शेख, उद्धव मेहंदळे, यशवंत परशुरामकर, नामदेव डोंगरवार, रमेश ताराम, योगेश नाकाडे, निप्पल बरय्या, प्रफुल्ल ठाकरे, कान्हा बघेले, अजय हिरापुरे, लव माटे, रौनक ठाकूर, पंकज पटले, आशिष येरणे, जितेंद्र पारधी, राहुल पुस्तोडे, निखिल ठाकरे, रवि बडोले, कमलेश बारेवार, लखन रहांगडाले, रोशन कापगते, संदीप राऊत, सुनील बुराडे, ओमेश बिजेवार, चेतन बोरकर, आमीर शेख, मनोज बोपचे, योगेश चौधरी, प्रवीण मेंढे, आकाश रामटेके, विक्की मसराम, निखिल कामथे, पूरण सयाम, चेतन वाढवे, विनायक मसे, नारायण भेंडारकर, दीपक रहेले, सोमदास गणविर, विवेक बोरकर, रतिराम राणे, शुभम गौतम, युवराज झोडे, सतीश शहारे, हर्षद हलमारे, प्रशांत डोंगरवार, निलकंठ बोरकर, मनोज भालकाडे, श्रीकांत मस्के, अनिल राऊत, भोजराम राऊत, त्र्यंबक झोले, अजय टेंभुर्णे, गौरव दीप, सर्वेश धांडे, शालीकराम हातझाडे उपस्थित होते.या वेळी उपस्थित मान्यवरांनी केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी जनतेला मोठमोठी आश्वासने देऊन दिशाभूल करण्याचे काम केले. त्यामुळे कार्यकर्त्यांनी या सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आणण्याचे आवाहन केले.
राष्ट्रवादी काँग्रेसला बळकट करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 9:30 PM
गोंदिया-भंडारा जिल्ह्यात खा.प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्त्वात विविध विकास कामे करण्यात आली. शैक्षणिक सुविधा, सिंचन, पर्यटन क्षेत्रात अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न केले.
ठळक मुद्देअंजिक्य पाटील : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा, पक्ष बांधनीवर चर्चा