शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

सार्वजनिक हितासाठी संघटन बळकट करा

By admin | Published: May 27, 2017 12:48 AM

शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी

ग.दी. कुलथे : जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांची सभा लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वयातून करावे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करीत असताना सार्वजनिक हितासाठी आपले संघटन बळकट करावे, असे आवाहन राजिपत्रत अधिकारी महासंघाचे संस्थापक व मुख्य मार्गदर्शक ग.दी. कुलथे यांनी केले. बुधवार (दि. २४) रोजी जिल्ह्यातील राजिपत्रत अधिकाऱ्यांची सभा जिल्हा कोषागार कार्यालयात घेण्यात आली. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रमोद रक्षमवार, संवाद सचिव माधव झोड, सरचिटणीस किशोर मिश्रीकोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. कुलथे पुढे म्हणाले, राज्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. या मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या १२ ते १४ जुलै दरम्यान लाक्षणकि संप पुकारण्याचा निर्णय अधिकारी व कर्मचारी संघटनेने घेतला आहे. अधिकारी व कर्मचारी काम करीत असताना त्यांना मारहाण व दमदाटी करणाऱ्याला आता दोन ऐवजी पाच वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून एकत्र असले पाहिजे. आपल्या मागण्या सोडविण्यासाठी संघटन हे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. आपला महासंघ हा राजकारणापासून अलिप्त असल्याचे सांगून कुलथे म्हणाले, केंद्रात व २२ राज्यात सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ही ६० वर्षांची आहे. त्याचप्रमाणे राज्यातसुध्दा सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ५८ वरून ६० वर्षे करावी. त्याचप्रमाणे पाच दिवसांचा आठवडा करणे, बालसंगोपन रजा वाढविणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेणे, सातवा आयोग जानेवारी २०१६ पासून लागू करणे यासह अनेक आपल्या मागण्या असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने बांद्रा येथे राजपत्रित अधिकारी महासंघास १,३८१ चौरस मीटर आकाराचा भूखंड १ रूपये नाममात्र दराने उपलब्ध करु न दिला आहे. या बांधकामासाठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी सढळ हस्ते मदत करावी असे सांगून कुलथे म्हणाले, मुंबई येथे कामानिमित्त येणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काही दिवस निवासासाठी ही वास्तू उपयोगात येणार आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. रक्षमवार यांनीही मार्गदर्शन केले. सभेला जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी प्रदिपकुमार बडगे, राज्य कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पाथोडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, अधिकारी-कर्मचारी समन्वय समितीचे सचिव दुलीचंद बुध्दे, पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ.के.पी. पटले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर. टेंभूर्णे, डॉ.सी. डब्ल्यू वंजारे, डॉ.एन.एस. येरणे, डॉ. अनंत चांदेकर, डॉ.पी.एस. खंडागळे, डॉ.बी.आर. पटले, डॉ.एस.पी. रहांगडाले, डॉ.आर.आर. कोठाडे, डॉ. मनोज राऊत, उपमुख्य लेखाधिकारी व्ही.ए. जवंजाळ, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी एस.एस. भिमटे, लेखा अधिकारी एस.एस. मसराम, डॉ.के.के. सरजर, रोजगार अधिकारी आर.एन. माटे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, डॉ. वेदप्रकाश चौरागडे, डॉ.एस.यु. हुमणे, लेखाधिकारी एल.एच. बावीस्कर, अप्पर कोषागार अधिकारी पी.डी. पारधी, डॉ.एस.बी. पटेल, सहायक गटविकास अधिकारी एस.एस. वाघाये आदी उपस्थित होते. प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.आर. टेंभूर्णे यांनी मानले. या वेळी संघटन बळकट बनविण्यासाठी चर्चा करण्यात आली.