देवरी : धानाच्या भावाचा प्रश्न किंवा बोसनचा प्रश्न असो, आपण प्रामाणिकपणे सोडविला आहे. आणखी शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, ते सोडविण्यासाठीसुद्धा आपण प्रयत्नशील आहोत, अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.
देवरी तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक सीताराम लॉन देवरी येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करावे, पक्ष संघटन मजबूत करावे, असे सांगून खा. पटेल यांनी येणाऱ्या काळातील निवडणुका आपण नक्की जिंकू, असा विश्वास व्यक्त केला. परिसरातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खा. पटेल यांनी जिल्हा पणन अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून चर्चा केली व समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. सर्वसामान्य जनतेच्या अडचणी जाणून त्या सोडविण्याला आधी प्राधान्य देण्याच्या सूचना खा. पटेल यांनी कार्यकर्त्यांना केल्या. बैठकीला माजी आ. राजेंद्र जैन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, दुर्गा तिराले, रमेश ताराम, सी.के. बिसेन, गोपाल तिराले, योगेश देशमुख, मुकेश खरोेले, हिमांशू तारामल, मुन्ना अन्सारी, युगेश बिसेन, चंचल जैन, गोपाल तिवारी, केशोराव भुते, दिलीप द्रुगकर, भास्कर धर्मशहारे, मोंटी अन्सारी, बबलू खान, राजेश बिंझलेकर, भय्यालाल चांदेवार, इंदल अरकरा, मनोहर राऊत, सत्यवान देशमुख, दीपेश टेंभरे, सारंग देशपांडे, सुजित अग्रवाल, घनश्याम बावनथडे, सुमन बिसेन, अर्चना ताराम, पारबता चांदेवार, मंजूषा वासनिक, शर्मिला टेंभुरकर, पुष्पा मस्के, विलास चाकोते, हेमंत ताराम, माधुरी शहारे, आरती जांगडे, पंकज शहारे, धनराज बावनथडे, प्रल्हाद भोयर, अनिल धोटे, महादेव श्यामकुंवर, महेंद्र विकोडे, वसंत देशमुख, पुनाराम तुलावी, सतीश बिसेन, रवींद्र मेश्राम, रंजन मेश्राम यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.