लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बऱ्यापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.यंदा मृग नक्षत्राची सुरुवात चांगल्या पावसाने झाली होती. परंतु त्यानंतर पूर्ण मृग नक्षत्र कोरडा गेला. एवढेच नव्हे तर भरपूर पाऊस पडणारा आद्रा नक्षत्र सुद्धा कोरडा गेला. दरम्यान शेतकऱ्यांनी घाई न करता सावध पवित्रा घेतला व पेरणी रोखून थांबविली. मात्र काही शेतकऱ्यांनी जूनच्या दुसऱ्या आठवड्यातच पेरणी केली. त्यानंतर सतत १५ दिवस पाऊस पडला नाही आणि पºहे अर्धे उगवलेच नाही. ज्यांनी जून महिन्याच्या तिसऱ्या-चौथ्या आठवड्यात पेरणी केली आता त्यांचे पºहे उगवले. परंतु पाणी असून सुद्धा नर्सरी आखूड असल्याने रोवणी योग्य झाल्या नाहीत. त्यामुळे आणखी एक आठवडा रोवणीला सुरुवात करायला उशीर होऊ शकतो.या दरम्यान ज्यांची नर्सरी वाढीत आली, त्यांनी रोवणी सुरु केली आहे. सतत पाऊस पडत राहिला तर सर्वांच्या रोवण्या जुलैअखेर किंवा आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत संपणार, असे चित्र आहे. सोमवार आणि मंगळवारी झालेल्या दमदार पावसामुळे शेतीच्या कामाला जोमाने सुरूवात झाल्याचे चित्र तालुक्यात आहे.काही भागात अजूनही दमदार पावसाची वाटतालुक्यातील झालीया, कावराबांध, बिंझली परिसरात तसेच सोनपुरी, बाम्हणी परिसरात अजून दमदार पावसाची वाट शेतकरी बघत आहे. या भागात कोरडवाहू रेताळ किंवा खडकाळ जमीन असल्याने शेतात पाणी जास्त काळ थांबून राहत नाही. या भागात सतत आठ दिवस पर्जन्यमान झाल्याशिवाय जल संग्रहण होत नाही. अजूनही या भागात रोवणीला खरी सुरुवात झाली नाही. शेतकरी दमदार पावसाची वाट आहे. यातच सालेकसा, पिपरीया, दरेकसा, बिजेपार आदी परिसरात पुरेसा पाऊस पडत असल्याचे दिसत आहे.
तालुक्यात पावसाची दमदार हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 12:19 AM
मागील दोन दिवसांपासून सुरू असलेला दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. शेतात पुरेशा प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी रोवणीला सुरुवात केली आहे. मात्र काही भागात अजूनही बºयापैकी पाऊस झाला नसल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देशेतीच्या कामाला वेग : अनेक ठिकाणी रोवणीला सुरुवात