शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
जगभर : मुजतबा खामेनेई : ‘शांत’ डोक्याचा ‘सुप्रीम लीडर’!
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
6
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
7
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
8
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
9
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
10
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
11
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
12
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
13
विशेष लेख: हवामानबदल रोखण्याचा ‘खर्च’ कोण उचलणार, यावर खडाजंगी
14
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
15
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
16
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
17
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
18
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
19
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
20
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल

आदिवासींचे वास्तव जगापुढे आणण्याची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2018 10:20 PM

एकीकडे सरकार डिजीटल इंडियाचा नारा लावत अत्याधुनिक सोयी सुविधा देशातील नागरिकांना देण्याचा गवगवा करीत आहे. असे असताना मात्र भारत देशात राहणारे मूळ निवासी ज्यांना आदिवासी म्हणून ओळखले जाते तो आदिवासी समाज विकासाच्या पडद्याआड जीवन जगत असून अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांसाठीच दिवसरात्र संघर्षरत असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देशतालीने घेतला वसा : सहा राज्यांचा खडतर प्रवास, अनेक शहरांत लावली छायाचित्र प्रदर्शनी

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एकीकडे सरकार डिजीटल इंडियाचा नारा लावत अत्याधुनिक सोयी सुविधा देशातील नागरिकांना देण्याचा गवगवा करीत आहे. असे असताना मात्र भारत देशात राहणारे मूळ निवासी ज्यांना आदिवासी म्हणून ओळखले जाते तो आदिवासी समाज विकासाच्या पडद्याआड जीवन जगत असून अन्न, वस्त्र व निवारा या मुलभूत गरजांसाठीच दिवसरात्र संघर्षरत असल्याचे दिसत आहे. या आदिवासींचे वास्तव जगासमोर आणून भारतातील आदिवासी समाज आज २१ व्या शतकात सुध्दा कोणत्या दशेत आहे, हे जगापुढे आणण्याचा वसा शताली शेडमाके या युवतीने घेतला आहे.आदिवासी लोकांच्या मधात जाऊन त्यांचे वास्तविक दैनंदिन जीवन, खानपान, वेशभूषा, आरोग्य व राहणीमान इत्यादी जाणून घेण्यासाठी शतालीने दुर्गम ते अतिदुर्गम भागात जाण्याचा धाडस केला.मागील तीन वर्षात तिने मध्यभारतातील पाच-सहा राज्यांचा खडतर प्रवास केला. यात दंडकारण्य प्रदेशासाठी संबंधीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड, ओरीसा, तेलगंणा, आंधप्रदेश या राज्यातील आदिवासी बहुल दुर्गम क्षेत्राचा खडतर व कठीण प्रवास केला या दरम्यान तिने अनेक दिवस व रात्र आदिवासी लोक वस्तीत घालविले.या दरम्यान तिने आपल्या सुख, सोयी व वैभवाला बाजूला ठेवून त्यांच्या सोबत कंद, मूळ, फळ, पानाफुलांचा आहार व गवताच्या झोपडीत निवास केला. दगड व लाकडावर तासनतास बसून राहणे, तहान व भूक सहन करणे, इत्यादी अनेक प्रकारचे कष्ट सहन करीत आदिवासींच्या जीवनशैलीची प्रत्येक बाजू जाणून घेत.यासोबतच आवश्यक सोयी सुविधांपासून आदिवासी समाज किती दूर राहून जगत आहे. आरोग्य, पिण्याचे शुध्द पाणी, निवासासाठी पक्के घर शिक्षण या सोयींसोबतच वीज व रस्ते या सुविधा त्यांना केव्हा मिळणार असे प्रश्न या चित्र प्रदर्शनीतून निर्माण होताना दिसतात. आपल्या तन, मन व धनाचा वापर करीत शताली छायाचित्रांची प्रदर्शनी लावण्यासाठी सतत धडपड करीत असते.या मागे कसलेही अर्थार्जन करण्याचा भाव नसून आदिवासी मागासलेल्या समाजाला आधुनिक प्रवाहात आणण्यासाठी आपण किती योगदान देऊ शकतो यासाठी शताली सतत संघर्षरत आहे.शताली धनेगाव येथे वास्तव्यास असली तरी आपला जास्तीतजास्त वेळ ती आदिवासींच्या प्रगतीच्या दिशेने घालविते.सोश मीडियाचाही वापरआदिवासींसोबत राहून शतालीने त्यांचे दैनंदिन जीवन कॅमेरात टिपले असून या छायाचित्रांचे संग्रहन व संकलन करीत त्यांचे मोेठे छायाचित्र तयार केले आणि आदिवासी आजही कोणत्या दयनीय अवस्थेत जगत आहे हे जगासमोर आणण्यासाठी देशातील लहानमोठ्या शहरात चित्र प्रदर्शनी लावत आहे. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हैदराबाद, बंगलोर, मुंबई, दिल्ली व भोपाळ इत्यादी शहरांसह मोठे धार्मिक उत्सव व संमेलन आदि ठिकाणी छायाचित्र प्रदर्शनी लावली. एवढेच नाही तर काही छायाचित्र निवडून त्यांचे कॅलेडर सुद्धा तयार केले आणि या माध्यमातून आदिवासी जीवनशैलीचे वास्तव जगासमोर प्रकट करण्याचा प्रयत्न केला. याशिवाय शतालीने फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, युट्यूब, इंटरनेट इत्यादी सोशल मिडीयाद्वारे आदिवासींचे वास्तव सामान्य ते खास आणि शासन ते प्रशासन तसेच जनतेपासून सरकार दरबारी पोहोचविण्याचा प्रयत्न केला.