शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
4
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
5
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
6
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
7
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
8
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
9
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
10
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
11
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
12
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
13
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
14
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
15
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
16
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
17
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
18
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
19
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
20
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध

तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी मारहाण

By admin | Published: September 26, 2016 1:45 AM

गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरु केली.

१२ जणांवर गुन्हा दाखल : गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथील घटनागोंदिया : गावाला शांततेतून समृद्धीकडे नेण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिम सुरु केली. या मोहिमेच्या समितीवर असलेल्या अध्यक्षाला गावात सम्मानाचे स्थान मिळत असल्याने अध्यक्ष पदासाठी वाद होऊ लागले. परिणामी एकमेकांना मारहाण करुन प्रकरण पोलिस ठाण्यांपर्यंत पोहोचत असल्याचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथे तंटामुक्त अध्यक्ष पदासाठी झालेल्या वादात एकमेकांना मारहाण करण्यात आली. परिणामी दोन्ही गटातील १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोरेगाव तालुक्याच्या चिल्हाटी येथे शनिवारी दुपारी २ वाजता तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड होती. तंटामुक्त अध्यक्षपदासाठी फिर्यादी माणिकचंद इसूलाल पारधी (५५) यांनी रमेश सिलेवार यांचे नाव सुचविले. त्यावरुन झालेल्या वादात आरोपी विनोद पुरण रंगारी, लालचंद चैतराम चव्हाण, नरेश चैतराम चव्हाण, मनोज लोकचंद चव्हाण, उमराव आडकण ठाकूर व विजय दशरथ पारधी या सहा जणांनी माणिकचंदला अश्लिल शिवीगाळ करुन ठार करण्याची धमकी दिली. त्या सहा जणांवर भादंविच्या कलम १४३,२९४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. रमेश सिलेवार यांचे नाव सुचविताच गोंधळ घालून सभा तहकूब केली असता आरोपी रविंद्र टालीकराम पटले, रमेश लक्ष्मण सिलेवार, भुषण बुधराम ठाकूर, मोरेश्वर चव्हाण, माणिकचंद पारधी व प्रकाश गुलाब पटले या सहा जणांनी शिवीगाळ करुन ठार करण्याची धमकी दिली.प्रेमकला भरतलाल कटरे यांच्या तक्रारीवरुन सदर आरोपी विरुद्ध भादंविच्या कलम १४३,२९४, ५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)