कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लॉकडाऊनमुळे सुमारे ३ महिने एसटी बंद पडून राहिल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने आता मालवाहतूक सुरू केली आहे. राज्यात २६ मे पासून परिवहन महामंडळाने हा प्रयोग सुरू केला असून महिना लोटूनही गोंदिया आगाराकडे अद्याप एकही बुकींग झाली नसल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, परिवहन महामंडळाच्या इतिहासात प्रथमच मालवाहतूक केली जात असल्याने नागरिकांना याबाबत माहिती नसल्याचा परिणाम होत आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अवघ्या देशातच लॉकडाऊन करण्यात आले. शिवाय रेल्वे, बस व विमान व जल वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली होती. सुमारे ३ महिने ही वाहतूक ठप्प असल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका बसला आहे. राज्य शासनाने प्रवासी सुविधेत शिथिलता दिली असताना आता प्रवाशांकडून प्रतिसाद नसल्याने एसटी तोट्यातच धावत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रथमच मालवाहतूक सुरू केली आहे. महामंडळाच्या इतिहासात आता प्रथमच लालपरी प्रवाशांसह मालवाहतूक करीत आहे याबाबत मात्र कित्येकांना माहिती नाही. राज्यात २६ मे पासून एसटीने मालवाहतूक सुरू झाली असून असे असतानाही गोंदिया आगाराकडे मात्र अद्याप एकही बुकींग झाली नाही. विशेष म्हणजे, गोंदिया आगाराच्या बस फेऱ्या धावत असून प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने त्याही फक्त डिझेलचा खर्च काढत असल्याची माहिती आहे. त्यात मालवाहतूक सुरू असूनही बुकींग नसल्याने गोंदिया आगाराची आर्थिक स्थिती जैैसे थे आहे.अनपेक्षित असा हा प्रयोगलालपरी फक्त प्रवाशांसाठी धावत आली असून मालवाहतूक कधीच केलेली नाही. मात्र ‘परिस्थिती सर्व काही करवून घेते’ या म्हणीनुसार, राज्य परिवहन महामंडळालाही मालवाहतुकीचा प्रयोग करण्याची पाळी आली आहे. मात्र अनपेक्षित असा हा प्रयोग असून आजही कित्येकांना याबाबत माहिती नाही. शासकीय-निमशासकीय कार्यालयांच्या माल वाहतुकीचे कंत्राट झाले आहे. खासगी व्यापारीही त्यांच्या जुन्याच पद्धतीने मालवाहतूक करीत आहेत. परिणामी गोंदिया आगाराकडे बुकींग नाही. मात्र आगारातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयांना भेटी व व्यापाऱ्यांशीही संपर्क साधणे सुरू असून लवकरच त्यांच्या प्रयत्नांना फळ मिळेल अशी आशा गोंदिया आगाराच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
एसटीच्या मालवाहतुकीचा श्रीगणेशा झालाच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 5:00 AM
कोरोनाचा प्रादुर्भाव बघता अवघ्या देशातच लॉकडाऊन करण्यात आले. शिवाय रेल्वे, बस व विमान व जल वाहतूक सुद्धा बंद करण्यात आली होती. सुमारे ३ महिने ही वाहतूक ठप्प असल्याने राज्य परिवहन महामंडळाला याचा फटका बसला आहे. राज्य शासनाने प्रवासी सुविधेत शिथिलता दिली असताना आता प्रवाशांकडून प्रतिसाद नसल्याने एसटी तोट्यातच धावत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने प्रथमच मालवाहतूक सुरू केली आहे.
ठळक मुद्देमहिना लोटूनही बुकींगची प्रतीक्षा । नागरिकांना माहिती नसल्याचेही परिणाम, उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न