आॅनलाईन लोकमतअर्जुनी मोरगाव : भारतीय संस्कृतीत गुरु व शिष्याचे नाते हे पवित्र असते. शाळा हे एक पवित्र मंदिर आहे. ज्या पवित्र मंदिरातून आदर्श पिढी घडविण्याचे कार्य केले जाते. त्याच मंदिरात चिमुकल्या विद्यार्थिनींचा लैगिंक छळ केला जातो. ही घटना तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधेवाडा येथे मंगळवारी (दि.५) उघडकीस आली.या घृणास्पद प्रकाराबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्या शिक्षकावर अर्जुनी मोरगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून मंगळवारी रात्री त्याला अटक केली आहे. त्या आरोपी शिक्षकाचे नाव गोपाल निलकंठ जनबंधू (४८) आहे. तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुधेवाडा येथे सहायक शिक्षक पदावर कार्यरत आहे. तो शाळेत कर्तव्यावर असताना लघूशंका व मध्यान्ह सुटीत सहकारी शिक्षक नसल्याची खात्री करुन कधी एक, कधी दोन तर कधी तीन विद्यार्थिनीना बोलवायचा. वर्ग खोलीच्या खिडक्या व दरवाजा बंद करुन विद्यार्थिनींच्या गुदगुद्या व अनेक अश्लील चाळे करीत असे. हा प्रकार मागील महिन्याभरापासून सुरु होता. पिडित विद्यार्र्थिनी या तिसºया व चौथ्या वर्गातील आहेत. शिक्षकाकडून होत असलेल्या लैगिंक अत्याचाराची माहिती विद्यार्थिनींच्या पालकांना कळली. त्यांनी मंगळवारी याची अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक संदीप वाटोळे व देवरीचे पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जवळ यांनी बुधेवाडा येथे भेट दिली. आरोपी शिक्षकाविरुद्ध कलम ३७६ (२), (फ), (आय), (जे), ३५४ (अ) (१) (एक) भादंवि, सहकलम ३ (ब), ४, ७, ८, ९ (म), १० लैगिंक अपघरात बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलसिंह सूर्यवंशी तपास करीत आहेत.शिक्षकावर निलंबनाची कारवाईविद्यार्थिनीशी अश्लील चाळे करण्याची घटना उघडकीस आल्यानंतर जि.प.मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी तातडीने शिक्षक गोपाल जनबंधू यांच्यावर आज (दि.६) निलंबनाची कारवाई केली.
विद्यार्थिनीशी अश्लील चाळे, शिक्षकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 10:07 PM
भारतीय संस्कृतीत गुरु व शिष्याचे नाते हे पवित्र असते. शाळा हे एक पवित्र मंदिर आहे. ज्या पवित्र मंदिरातून आदर्श पिढी घडविण्याचे कार्य केले जाते.
ठळक मुद्देपालकांची पोलिसांत तक्रार : बुधेवाडा येथील घटना