वडसा येथील समाजकार्य महाविद्यालयातील एमएसडब्ल्यू भाग-२ चे विद्यार्थी उमेश मोरेश्वर उदापुरे, सहेबाज नासीर शेख आणि हीना हरी ठवकर यांनी क्षेत्र कार्य अंतर्गत गावातील प्रत्येक वॉर्डात जाऊन सापांविषयी असलेले गैरसमज तसेच सर्पदंशापासून वाचण्याचे उपाय गावकऱ्यांना पटवून दिले. सोशल मीडिया, पीपीटी आणि व्हॉट्सॲपद्वारे सर्पदंशावर माहिती दिली. प्रा. दीपक बागळकर, प्रा. अनिल बनपूरकर आणि प्राचार्य अनिल थूल यांच्या मार्गदर्शनात ही जनजागृती करण्यात आली. सोबतच कोरोना काळात घ्यावयाची काळजी आणि लसीकरणाचे फायदे गावकऱ्यांना समजावून सांगितले. क्षेत्र कार्य हे शारीरिक अंतराचे पालन तसेच संपूर्ण खबरदारी घेऊन करण्यात आले. या अंतर्गत नगरपंचायत मुख्याधिकारी विवेक मेश्राम आणि तालुका आरोग्य अधिकारी मेश्राम यांची भेटसुद्धा घेण्यात आली.
विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन केली विविध विषयांवर जनजागृती ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:30 AM