शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; मात्र सोलापुरात देवेंद्र फडणवीसांची एकही सभा नाही!
2
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
3
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
4
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
5
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
6
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
7
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
8
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
9
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
10
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
11
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
12
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
13
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
14
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
17
आधी मलिदा काढला, सत्ता गेल्यावर विरोध सुरू; शिंदेंचा मविआवर घणाघात  
18
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
19
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
20
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."

विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजाराची लागण

By admin | Published: February 22, 2017 12:25 AM

तालुक्याच्या गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन आठवड्यांपासून त्वचारोगाच्या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे.

कर्मचारीही झाले ग्रस्त : शाळा बंद ठेवून विद्यार्थ्यांना पाठविले स्वगावी गोरेगाव : तालुक्याच्या गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांना गेल्या दोन आठवड्यांपासून त्वचारोगाच्या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे. रोग निवारण्यासाठी गोरेगावपासून तर गोंदियापर्यंत औषधोपचार करण्यात आले. मात्र इतर विद्यार्थ्यांना व काही कर्मचाऱ्यांनाही या आजारातून संसर्ग होऊ लागल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्या विद्यार्थ्यांना औषधोपचारानंतर स्वगावी पाठविण्यात आले. गणखैरा येथील किरसान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये वर्ग पहिली ते दहावीपर्यंत आदिवासी प्रकल्प विभाग देवरीद्वारे निवासी शाळा कार्यरत आहे. या निवासी शाळेत एकूण २८५ विद्यार्थी विद्यार्थिनी शिकत आहेत. दोन आठवड्यापूर्वी जवळपास २०० विद्यार्थ्यांना डोळ्याची जळजळ होऊन डोळे व चेहऱ्यावर सूज तसेच चेहऱ्यावर काळे डाग आले. त्वचा खाजवायला सुरूवात झाली. विद्यार्थ्यांनी खाजवताच चेहरा व डोळ्यावरची कातडी निघून जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या आजाराची तपासणी ग्रामीण रुग्णालय गोरेगाव येथील डॉ. राहुल बिसेन यांनी केली असता संसर्गजन्य रोगाची लागण होवून इतरांनाही होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच विद्यार्थ्यांना योग्य उपचारासाठी गोंदियाला दाखविण्याचा सल्ला दिला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. केटीएसमधील त्वचारोग तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांवर औषधोपचार केले, मात्र इतरांना आजाराची लागण होऊ नये म्हणून इतर विद्यार्थ्यांपासून दूर त्यांच्या स्वगावी ठेवून आराम करण्याचा सल्ला दिला. विशेष म्हणजे ही शाळा नदीच्या काठाजवळ असून उष्णा मिलचे दुर्गंधीयुक्त पाणी व राख या शाळेच्या परिसराजवळ आहे. विद्यार्थ्यांना पिण्यासाठी, आंघोळ व स्वयंपाक करण्यासाठी स्थानिक विहिरीचे पाणी वापरले जाते. राईस मिलच्या पाण्याच्या निचऱ्याने विहिरीचे पाणी दूषित झाल्याची चर्चा तालुक्यात आहे. पण ग्रामपंचायतने किंवा आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने घेतले नसल्यामुळे दूषित पाण्याची माहिती मिळाली नाही. (शहर प्रतिनिधी)