लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व दिशा देण्यासाठी देशात व परदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान नागपूर यांच्या वतीने दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच पार पडली. गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना भारतातील व परदेशातील उच्च शिक्षणाच्या सुवर्णसंधी या विषयावर सामाजिक न्याय भवन येथे मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी शिक्षणतज्ञ अनिर्बन रॉय चौधरी व हेमंत सुटे उपस्थित होते. बडोले म्हणाले, सन २०१७-१८ मध्ये बार्टीमार्फत नागरी सेवा परीक्षेमध्ये १०० विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता एक वर्षाच्या कालावधीसाठी दिल्ली येथील उच्च गुणवत्तेच्या खाजगी शिकवणी वर्गामध्ये पाठविण्यात आले. त्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना नागरी सेवा परीक्षेमध्ये आपल्या यशाचा ठसा उमटविला आहे. सन २०१८-१९ मध्ये बार्टीमार्फत नागरी सेवा परीक्षेकरीता २०० विद्यार्थ्यांना परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरीता पाठविण्याचा मानस असल्याचे सांगितले. प्रास्ताविक समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिध्दार्थ गायकवाड यांनी मांडले. संचालन प्रदीप ढवळे यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा जात पडताळणी समितीचे प्रादेशिक उपायुक्त देवसूदन धारगावे यांनी मानले. यशस्वीतेसाठी समाज कल्याणचे सहायक आयुक्त डॉ.मंगेश वानखेडे, विशेष अधिकारी संभाजी पोवार व सर्व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 9:49 PM
विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव व दिशा देण्यासाठी देशात व परदेशात उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी येथे केले.
ठळक मुद्देराजकुमार बडोले : दोन दिवसीय कार्यशाळा