शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 1:15 AM

तालुक्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून ओळखली जाणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.९) सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला.

ठळक मुद्देजि.प.सभापतीला केले पाचारण : नियुक्तीचे तडकाफडकी आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : तालुक्यातील पहिली डिजीटल शाळा म्हणून ओळखली जाणारी जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी बुधवारी (दि.९) सकाळी ११ वाजता पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. दरम्यान विद्यार्थ्यांनी काढलेल्या आंदोलनाची दखल घेत पंचायत समिती प्रशासनाने शिक्षकाची त्वरीत नियुक्ती केली. विशेष म्हणजे चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढल्याची जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच वेळ असावी.एकीकडे शासन शैक्षणिक सुधार करण्याच्या देखावा करीत आहे. प्रत्येक मुल शाळेत गेले पाहिजे या दिशेने पाऊल उचलण्याचे काम करीत असल्याचे सांगत जि.प.शिक्षण विभागाचे अधिकारी स्वत:ची पाठ थोपाटूृन घेत आहे. मात्र दुसरीकडे शाळेत नियमित शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या शिकविण्यासाठी शिक्षक नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. वांरवार शिक्षकाची मागणी करुन सुध्दा शिक्षकाची नियुक्ती न केल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे पालक आणि गावकºयांच्या उपस्थितीत बुधवारी पंचायत समिती कार्यालयावर धडक दिली. त्यांचा हा आक्रोश पाहता जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले यांना पाचारण करण्यात आले होते. अंबुले यांनी विद्यार्थी व पालकांच्या मागणीची दखल घेत गुरूवारी (दि.१०) शाळेत शिक्षकाची नियुक्ती करण्याचे आदेश काढले. तसेच शिक्षकाच्या नियुक्तीचे आदेश सुध्दा लगेच काढण्यात आले. त्यानंतर हा मोर्चा मागे घेण्यात आला.जि.प.वरिष्ठ प्राथमिक शाळा बोदलबोडी या शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत एकूण १९६ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यानुसार शाळेत एकूण नऊ शिक्षकांची गरज आहे. परंतु सध्या या शाळेत केवळ पाच शिक्षक कार्यरत आहेत.त्यामुळे दररोज शिक्षकाअभावी इयत्ता तिसरी व चौथ्या वर्गाची तासीका होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. ही शाळा एक उपक्रमशील शाळा असून या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक विविध नवोपक्रम राबवित असतात.परंतु शिक्षक संख्या कमी असल्याने बरेचदा त्यांची अडचण होते. मागील अनेक दिवसांपासून गावकरी शिक्षकाची व्यवस्था करुन देण्याची मागणी करीत होते. त्यांनी शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला कुलूप ठोकण्याचा सुध्दा इशारा दिला होता. परंतु शिक्षण विभागाने याकडे दुर्लक्ष केले.त्यामुळे बुधवारी (दि.९) विद्यार्थी व पालकांनी थेट पंचायत समितीवर धडक दिली. याप्रकरणाची दखल घेत जि.प.सदस्य व माजी समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांनी जि.प.शिक्षण सभापती रमेश अंबुले व शिक्षणाधिकारी यांच्याशी दृूरध्वनीकरुन संपर्क साधला. त्यानंतर ते सालकसा पंचायत समितीत दाखल झाले. त्यानंतर राधेश्याम टेकाम या शिक्षकाला बोदलबोडी शाळेत पाठविण्याचे आदेश दिले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीMorchaमोर्चा