शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

शंभर टक्के प्रगतीसाठी अध्ययन स्तर निश्चिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:46 PM

शिक्षण विभागाने उत्कृष्ट कार्यात आणखी एक भर टाकली जात आहे. शंभर टक्के विद्यार्थी व शाळा विकसीत करण्यासाठी आता नागपूर विभागात ‘अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रम’ शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून सुरू करण्यात येत आहे.

ठळक मुद्देजि.प. शाळांमध्ये राबविणार उपक्रम। गुणवत्ता वाढीवर भर

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शिक्षण विभागाने उत्कृष्ट कार्यात आणखी एक भर टाकली जात आहे. शंभर टक्के विद्यार्थी व शाळा विकसीत करण्यासाठी आता नागपूर विभागात ‘अध्ययन स्तर निश्चिती व गुणवत्ता विकास कार्यक्रम’ शैक्षणिक सत्र २०१९-२० पासून सुरू करण्यात येत आहे. या कार्यक्रमात गोंदिया जिल्ह्यातील १३८४ शाळांचा समावेश राहणार आहे.या उपक्रमातंर्गत जिल्हा परिषद, नगर परिषद, खासगी अनुदानित व अंशत:अनुदानित शाळांना दुसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना अध्ययनस्तर निश्चिती तपासणीच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येईल.तपासणीत भाषा व गणित विषयाचा अध्ययनस्तर निश्चित केला जाणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीला करण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून मूलभूत क्षमता प्राप्त करण्यात विद्यार्थ्यांना जी समस्या येते, ती समस्या सोडविण्यासाठी मदत होणार आहे.कार्यक्रमांतर्गत भाषा व गणित विषयाच्या तपासणीसाठी शाळांना टेस्टिंग टूल्स उपलब्ध करवून दिले जाणार आहेत. या अंतर्गत प्रारंभ,मध्यम व अंतिम चाचणी होईल. या उपक्रमासाठी समित्या गठित करण्यात आल्या आहेत. जिल्हा स्तरावर जिल्हा साधन व्यक्ती (डीआरपी) समितीत १३ लोकांचा समावेश आहे. समितीचे प्रशिक्षण २६ ते २९ जुलै दरम्यान नागपूर येथे घेण्यात येणार आहे.यानंतर जिल्ह्यात तालुका साधन व्यक्ती (बीआरसी) चे प्रशिक्षण होईल.या समितीत १३ लोकांचा समावेश राहणार आहे. या समितीद्वारे केंद्रीय साधन गट (सीआरजी) ला पहिले प्रशिक्षण दिले जाणार आहे.या गटात १५ जणांचा समावेश राहील. हा गट केंद्र स्तरावर काम करणार आहे.महाराष्ट्र सरकारने २२ जून २०१५ ला प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला.यातून ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा निर्मिती, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सिब्लिटी), पीएसआर (पब्लिक सोशल रिसपॉन्सिब्लिटी) सारख्या अनेक उपक्रमांच्या माध्यमातून जि.प.शाळेच्या विद्यार्थ्यांना हॉयटेक विद्यार्थी करण्याचे काम सुरू करण्यात आले.वाचन आनंद दिवस, वाचन प्रेरणा दिवस यासारखे उपक्रमही राबविण्यात आले.आता मुख्यमंत्र्यांकडून शालेय शिक्षण विभागाला दिलेल्या केआरए (राऊंड एरिया) अनुसार शंभर टक्के स्कूल व प्रगत विद्यार्थी हा उद्देश ठेवण्यात आला आहे.शेजारच्या राज्यांच्या बोलीभाषेचा पडतो प्रभावछत्तीसगड व मध्यप्रदेश या राज्यांच्या सीमेला लागून गोंदिया जिल्ह्यातील आमगाव, सालेकसा व गोंदिया तालुक्याची सीमा लागून आहे. या तिन्ही तालुक्याच्या विद्यार्थ्यांच्या बोलीभाषेवर या दोन राज्याच्या बोलीभाषेचा प्रभाव पडतो. या प्रकारे काही तालुके आदिवासी बहुल असल्यामुळे स्थानिक बोलीभाषेचा विद्यार्थ्यांवर प्रभाव पडतो.या विपरीत परिस्थितीत ‘असर’ सर्वेक्षण २०१६ च्या अहवालात गोंदिया जिल्हा राज्यात ११ व्या क्रमांकावर होता. सन २०१८ मध्ये ७ व्या क्रमांकावर राज्यात तर विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता.

टॅग्स :Educationशिक्षण