शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

सुभाष बाग ‘कात’ टाकणार

By admin | Published: February 15, 2016 1:48 AM

नगर परिषदेची या वर्षातील पहिलीच आमसभा सुभाष बागेला अत्यंत लाभदाक ठरली आहे. प्रभारी बगिचा निरीक्षकांच्या मागणीवरून

कपिल केकत गोंदियानगर परिषदेची या वर्षातील पहिलीच आमसभा सुभाष बागेला अत्यंत लाभदाक ठरली आहे. प्रभारी बगिचा निरीक्षकांच्या मागणीवरून आमसभेत ठेवण्यात आलेल्या विविध मागण्यांना सभेत मंजूरी मिळाल्याने बागेला आता विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. त्यामुळे शहरातील एकमेव सुभाष बाग आता ‘कात’ टाकणार असून शहरवासीयांना लवकरच त्याचे नवे रूप बघावयास मिळणार आहे. शहरात आजघडीला सिव्हील लाईन्स परिसरात असलेले सुभाष बाग हेच एकमेव बाग उरले आहे. त्यामुळे या बागेतच शहरवासी काही काळ निवांत घालविण्याची अपेक्षा बाळगून येतात. बागेतील खेळण्यांवर खेळण्या-बागडण्यासाठी चिमुकल्यांची येथे गर्दी असते. तर सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी नित्यनेमाने येणाऱ्या महिला व पुरूषांनीही सुभाष बाग भरगच्च असते. मात्र बागेत येणाऱ्या नागरिकांना पुरविता येणार एवढ्या सुविधा येथे नसल्याने नागरिकांची असुविधा होते. एकच बाग असून त्याकडेही नगर परिषद प्रशासनाचे होत असलेले दुर्लक्ष शहरवासीयांना खटकते. नेमकी हीच बाब लक्षात घेत प्रभारी बगिचा निरीक्षक प्रवीण मिश्रा यांनी १२ जानेवारी रोेजी झालेल्या आमसभेत बागेत आवश्यक असलेल्या सुविधांबाबत प्रस्ताव ठेवला होता. शहरातील एकमेव बाग व त्याकडून शहरवासीयांना अपेक्षीत असलेल्या सुविधांचे गांभीर्य लक्षात घेत आमसभेत बागेतील सुविधांना घेऊन मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. आमसभेची मंजूरी मिळाल्याने आता बागेत विविध सुविधा पुरविल्या जाणार आहेत. यात काही बांधकामही केले जाणार आहे. जेणेकरून बागेत येणाऱ्या नागरिकांना त्रास होणार नाही. या सर्व सुविधा उपलब्ध होताच सुभाष बाग आपल्या नव्या रूपाने शहरवासीयांसाठी उपलब्ध होणार. एकंदर सुभाष बाग लवकरच कात टाकणार असून त्याचे नवे रूप शहरवासीयांना बघावयास मिळणार आहे. व्यायाम सामग्री व बसण्यासाठी शेड बागेत मोठ्या संख्येत नागरिक व्यायाम करण्यासाठी येतात. मात्र व्यायाम सामग्री जीर्ण झाली आहे. अशात नवी व्यायाम सामग्रीची गरज आहे. तसेच पावसाळ््यात नागरिकांना बसण्यासाठी शेडची गरज आहे. याबाबत आमसभेत प्रस्ताव मांडला होता. आमसभेने मंजूरी दिल्याने व्यायाम सामग्री व शेडचे बांधकाम केले जाणार आहे. याशिवाय शहरातील संस्थांना वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत मोफत रोपट्यांचा पुरवठा करता यावा. शिवाय लोकांना आपल्या घरी लावण्यासाठी रोपटी उपलब्ध व्हावीत यासाठी पाच हजार रोपटी बागेत उपलब्ध करवून देण्याची मागणी करण्यात आली आहे. हा प्रस्ताव प्रलंबीत आहे. याला मंजूरी मिळाल्यास वृक्षारोपणाच्या कामाला प्रोत्साहन मिळणार. बाग येणार सीसीटीव्हीच्या निगराणीत बागेत सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी येणाऱ्या महिला व तरूणींची गर्दी असते. शिवाय असामाजीक तत्वांचाही प्रवेश नाकारता येत नाही. विशेष म्हणजे बागेतून वाहनांच्या चोरीच्या घटनाही घडल्या आहेत. अशात महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या व चोरीच्या घटनांना लक्षात घेत बागेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी करण्यात आली होती. बागेत सिसिटिव्ही लागल्यास त्याच्या भितीनेही छेडखानी व चोरीच्या घटनांवर आळा बसू शकतो. शिवाय आरोपीला पकडण्यासही मदत होणार असल्याने बागेत सीसीटीव्ही लावण्यास आमसभेत मंजुरी मिळाली आहे. - विशेष लाईनमेन व सहायक मिळणार सुभाष बागेत ७० विद्युत खांब आहेत. बागेत सायंकाळी व सकाळी लाईट्स लावले जातात. शिवाय फव्वारे, कार्यालयातील लाईट, दोन विहीरी व एक बोअरवेलवरील मोटर याशिवाय पशुचिकित्सालयातही बागेतूनच वीज पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे सायंकाळी बागेत फिरण्यासाठी नागरिक आले असता वीज पुरवठा खंडीत झाल्यास नागरिकांची गैरसोय होते. अशात नगर परिषदेच्या विद्युत विभागातील लाईनमेन बोलवावा लागतो. ते सुट्टीवर असल्यास खाजगी लाईनमेन बोलवावा लागतो. मात्र त्यांना बागेतील फिटींगची माहिती नसल्याने ते काम करू शकत नाही. अशात झाडांना पाणी टाकणे, बागेतील लाईट्स लावणे शक्य होत नाही. करिता बागेसाठी एक विशेष लाईनमेन व एक सहायकाची मागणी करण्यात आली होती. आमसभेत मंजूरी मिळाल्याने ही समस्या आता सुटणार आहे. सहा शौचालयांचे होणार बांधकाम बागेत फिरणाऱ्यांची संख्या मोठी असून दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मात्र नागरिकांसाठी बागेत आजघडीला एकही शौचालय नसल्याने येथे फिरण्यासाठी येणाऱ्यांची पंचाईत होते. विशेष म्हणजे महिलांना जास्त त्रास सहन करावा लागतो. अशात बागेत स्वच्छ भारत अभियानांतर्गत महिला व पुरूषांसाठी शौचालयांचे बांधकाम करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आमसभेत सहा शौचालयांच्या बांधकामाला मंजूरी मिळाली आहे.