कमी केलेले एकूण कर्मचारी - १११
डॉक्टर - १२
नर्स - ७२
औषध निर्माण अधिकारी - ०९
तंत्रज्ञ - १८
रुग्णवाहिका चालक - ००
.....................
हे कर्मचारी कमी केल्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणावर परिणाम झाला. आरोग्य विभागाला लसीकरण केंद्राची संख्या कमी करावी लागली. ग्रामीण भागात आरोग्य सेवेवर परिणाम झाला.
........
कोविड संसर्ग काळात कंत्राटी तत्वावर आम्हाल रुजू करून घेण्यात आले. या कालावधीत आम्ही आमचा जीव धोक्यात घालून सेवा दिली. पण आता आमची अवस्था गरज सरो वैद्य मरो अशीच झाली आहे. मागील तीन महिन्यांपासून रोजगाराच्या शोधात आमची भटकंती सुरू आहे.
- विलास ठाकरे, तंत्रज्ञ.
................
- अचानक सेवा समाप्तीचे आदेश दिल्याने रोजगाराचा प्रश्न, काेविडमुळे भरती बंद असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, आर्थिक अडचणी, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न.
......
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान बंद झाले, शिवाय कोविड सेंटर सुद्धा बंद झाले आहेत. त्यामुळे हे कर्मचारी अतिरिक्त झाले होते. या कर्मचाऱ्यांना कमी केल्याने आरोग्य यंत्रणेवर सध्या कुठलाही परिणाम झालेला नाही.
- नितीन कापसे, जिल्हा आरोग्य अधिकारी