लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : एकीकडे शासन शेतकऱ्यांना मदत केली असल्याची घोषणा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी पोहोचला नाही. ही बाब आमदार संजय पुराम यांना कळताच त्यांनी महसूल विभाग आणि बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभे करुन त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा करण्याचे निर्देश दिले. अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले.ग्राम हलबीटोला येथील श्री अर्धनारेश्वरालय येथे तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज वाटप मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित झाले होते. यात पीक कर्ज वाटपाबद्दल मार्गदर्शन तसेच विविध विषयांवर माहिती देण्यासाठी आमदार संजय पुराम, तहसीलदार प्रशांत सांगळे, पं.स. उपसभापती दिलीप वाघमारे, पं.स. सदस्य प्रतिमा परिहार, बी.डी.ओ. अशोक खाडे, तालुका कृषी अधिकारी जी.जी. तोडसाम, भाजपा तालुकाध्यक्ष परसराम फुंडे, मनोज बोपचे, शंकर मडावी तसेच विविध बँकांचे संचालक, व्यवस्थापक व इतर मान्यवर उपस्थित होते.प्रास्ताविकातून तहसीलदार सांगळे यांनी, शेतकºयांसाठी विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी बँक व्यवस्थापकांनी बँकेतून मिळणाऱ्या कर्जाची माहिती देण्याचा प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांनी बँक अधिकाºयांची सारवासारवची भाषा ऐकून संताप व्यक्त केला. तसेच आ. पुराम यांचा शेतकऱ्यांनी त्यांचा घेराव करीत आपापल्या समस्यांचा पाढा वाचला. आ.पुराम यांनी शेतकºयांच्या समस्या ऐकून शासनाच्या विविध योजनांतून मिळणारे अनुदान, पीक कर्ज इत्यादीबद्दल मार्गदर्शन केले.या पीक कर्ज मेळाव्यात जवळपास १८ शेतकऱ्यांना जागेवर पीक कर्ज वाटप करून प्रमाणपपत्र देण्यात आले. खरीप पीक कर्जाचा लाभ घेणाऱ्यांमध्ये नवेगाव येथील रामजी दमाहे हे प्रथम मानकरी ठरले. त्यांना आ. पुराम यांच्या हस्ते कर्ज वाटप प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. संचालन करून आभार नायब तहसीलदार खाडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी सर्व नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व इतर सहाय्यकांनी सहकार्य केले.बँक व्यवस्थापकांचा खोटेपणा उघडदरम्यान आ. पुराम यांना माहीत झाले की महसूल विम्यात आणि बँक कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी पोहोचला नाही. तसेच नवीन पीक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तेव्हा आ.पुराम यांनी महसूल कर्मचारी आणि बँक अधिकाऱ्यांना, येत्या काही दिवसांत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली पाहिजे, असे निर्देश दिले. या वेळी काही बँक व्यवस्थापकांनी रक्कम जमा केल्याची खोटी माहिती देत असताना शेतकऱ्यांनी त्यांच्या खोटेपणा उघड करून दिला. अशात ते थातुरमातुर माहिती देऊ लागले. त्यांच्यामध्ये काम करण्याबाबत समन्वयाचा अभाव आढळून आला.
मदतनिधी त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 10:19 PM
एकीकडे शासन शेतकऱ्यांना मदत केली असल्याची घोषणा करीत आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी पोहोचला नाही. ही बाब आमदार संजय पुराम यांना कळताच त्यांनी महसूल विभाग आणि बँक अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांसमोर उभे करुन त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतनिधी जमा करण्याचे निर्देश दिले. अन्यथा योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे ठणकावून सांगितले.
ठळक मुद्देपुराम यांचे निर्देश : शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांसमोर मांडल्या समस्या