शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

सुशिकलाच्या यशाने राज्याचे नाव झाले

By admin | Published: February 21, 2017 1:00 AM

एशियन चॅम्पीयनशिप सायकलिंग स्पर्धेत सुशिकला आगासेच्या रुपाने राज्याला पहिले कास्य पदक मिळाले.

निशीकांत इलमे : करडी येथे सुशिकला व प्रशिक्षक बुद्धे यांचा सत्कारकरडी (पालोरा) : एशियन चॅम्पीयनशिप सायकलिंग स्पर्धेत सुशिकला आगासेच्या रुपाने राज्याला पहिले कास्य पदक मिळाले. राज्याला आतापर्यंत या स्पर्धेत एकही पदक मिळालेले नव्हते. भारताला तीन वर्षानंतर पदक मिळाले आहे. यावरून सुशिकलाची कामगिरी लक्षात येते. यानंतर जुलै २०१७ मध्ये ती ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पीयन स्पर्धा चायना मध्ये खेळणार आहे. त्यानंतर एशियन कप स्पर्धेत दिल्ली, थायलंड व तायवान येथेही नशिब आजमावणार आहे. सध्या तिला आशियाई रँकमध्ये दुसरे स्थान आहे. ती देशाचे प्रतिनिधीत्व करीत आहे. सुशिकलामुळे महाराष्ट्राचे नाव झाले, असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निशीकांत इलमे यांनी व्यक्त केले.करडी जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालयाचे वतीने सुशिकला आगाशे व तिचे प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांचा सत्कार शाळेचे वतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. स्वागत सत्कार कार्यक्रमाचे मोहाडी पंचायत समितीचे उपसभापती विलास गोबाडे होते. प्रमुख अतिथीस्थानी सरपंच सीमा साठवणे, निशिकांत इलमे, प्रशिक्षक अ. वा. बुद्धे, सायकलपटू सुशिकला आगाशे, करडीचे ठाणेदार प्रभाकर बोरकुटे, डॉ.युवराज जमईवार, भाजपा तालुका अध्यक्ष बाबूजी ठवकर, भूमीगत स्वातंत्र्य संग्राम सैनिक श्यामसुंदर शेंडे, प्राचार्य दयाळनाथ माळवे, अशोक शेंडे, भगवान चांदेवार, विनायक शेंडे, मंगेश साठवणे, भाष्कर गाढवे, नशिरखाँ पठाण, मोहन किरणापुरे, सुशिकलाचे वडील दुर्गाप्रसाद आगाशे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचे हस्ते सुशिकला व तिचे प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.प्रास्ताविकातून प्राचार्य माळवे यांनी, सुशिकलामुळे शाळेला व जिल्ह्याला ओळख मिळाली. गावाचे नाव मोठे झाले. लहानशा गावातून सुशिकला प्रशिक्षक अ.वा. बुद्धे यांच्यामुळे समोर आली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात मेहनत करा, अभ्यासात जिद्द बाळगा, यश नक्कीच प्राप्त होते. यशस्वी होण्याची जिद्द ही पहिली पायरी आहे. यावेळी बुध्दे यांनी, सुशिकलाचे प्रशिक्षन तुडका मैदानावर झाले. सुरुवातीला तिच्यातील गुणांची परीक्षा मी केली. त्यामुळे तिचे घरी जाऊन तिला प्रशिक्षणासाठी तयार करवून घेतले. सुशिकलाचे रँकींग चांगले आहे. शिष्यामुळे गुरुचा मान वाढतो. तो मान मला आज मिळाला आहे .गुरु फक्त शिष्याला दिशा दाखविण्याचे काम करतो, तर शिष्याला मेहनतीच्या व जिद्दीच्या भरवशावर आपली दशा बदलायची असते, असे प्रतिपादन केले. जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी सुद्धा गरीबीतून खेळाचे भरवशावर आपली दशा बदलविली आहे. ती रोज ८ कि.मी. अंतरावरील शाळेत धावत जायची व शाळा सुटल्यानंतर घरी धावतच परत यायची. यावेळी त्यांनी अंदमान निकोबार येथील एका खेळाडूचे उदाहरण पटवून सांगितले. संचालन शिक्षक क्षीरसागर यांनी केले. तर आभार शिक्षक आडे यांनी मानले. यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)