गोंदिया : जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकांचे आधार सिडींगचे काम अंतिम टप्प्यात आहे. यापुढे रास्त भाव दुकानातून ज्या शिधापत्रिकाधारकांनी आधार क्र मांक, बँक खाते क्र मांक व त्यांचा मोबाईल क्र मांक दिला आहे त्यांनाच शिधावस्तुंचे वितरण शिधावाटप दुकानातून होणार आहे. यामुळे या कामात दिरंगाई करणाऱ्यांना शिधावस्तूंपासून वंचित राहावे लागणार आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांकडे गॅस कनेक्शन नाही, असे शिधापत्रिकाधारक केरोसीन मिळण्यास पात्र आहेत व अशाच शिधापत्रिकाधारकांना केरोसीनचा पुरवठा करण्यात येत आहे. सर्व शिधापत्रिकाधारकांनी त्यांचे आधार क्र मांक व भ्रमणध्वनी क्र मांक तात्काळ सादर करायचे आहे. भ्रमणध्वनी शक्यतो कुटुंब प्रमुखाचा असावा. कुटुंब प्रमुखाकडे भ्रमणध्वनी नसल्यास कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा भ्रमणध्वनी क्र मांक चालू शकेल. जे शिधा पत्रिकाधारक अशाप्रकारे आधार क्र मांक व भ्रमणध्वनी क्र मांक सादर करणार नाहीत त्यांना यापुढे अनुदानित दराचा कोटा देण्यात येणार नाही. केरोसीन मिळण्यास पात्र सर्व शिधा पत्रिकाधारकांनी १० मार्च २०१७ पर्यंत त्यांचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक तहसील कार्यालय व संबंधित रास्त भाव दुकानदार व केरोसीन विक्र ेते यांचेकडे जमा करायचे आहे. यापुढे प्रत्येक रास्तभाव दुकानात ‘पीओएस’ मशीनद्वारे धान्य पुरवठा होणार असल्याने व असा प्रयोग जिल्ह्यात दोन ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केल्याने याकरीता आधार क्रमांक अत्यावश्यक असल्याने तातडीने शिधा पत्रिकाधारकांनी आधार क्र मांक व बँक खाते क्र मांक जमा करावे. यापुढे रेशन दुकानात आधार क्र मांक हीच ओळख ठरणार आहे. आधार कार्ड नाही तर धान्य पुरवठा नाही याप्रमाणे ज्यांनी अद्याप देखील आधार क्र मांक काढले नसतील त्यांनी सुध्दा तहसील कार्यालयात जावून आपले आधार कार्ड, बँक खाते त्वरीत काढून घ्यावे. सार्वजनिक वितरण व्यवस्था ही आधार क्र मांकावर आधारीत वितरण व्यवस्था होणार असल्याने सर्व शिधा पत्रिकाधारकांनी याची नोंद घ्यावी.ज्या शिधापत्रिकाधारकांनी अद्याप त्यांचे आधार क्रमांक, बँक खाते क्रमांक रास्त भाव दुकानात जमा केले नसतील त्यांनी त्वरित आपले आधार क्र मांक दुकानाकडे जमा करावे, अन्यथा अशा शिधापत्रिकाधारकांचा सर्व शिधावस्तुंचा पुरवठा बंद करण्यात येईल अशी माहिती पुरवठा विभागाकडून करण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी)
दोन ठिकाणचा प्रयोग यशस्वी : आधार कार्ड व बँक खाते देणाऱ्यांनाच पुरवठा
By admin | Published: March 01, 2017 12:30 AM