नक्षलग्रस्त व दुर्गम भागात माहिती व पैशांअभावी काही लोक झालेले रोग अंगावर काढून घेतात. त्यातच देवरी तालुक्यातील ग्राम पुराडा येथील तरुण भोजराज गणेशराम पुंगळे (२५) याच्या हाताला फ्रॅक्चर झाला होता. पण माहिती व पैशाअभावी शस्त्रक्रियेची गरज असतानाही त्याची शस्त्रक्रिया होऊ शकली नाही. गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रा. प्रितम चोपकार यांनी लगेच याची माहिती सत्य सामाजिक संस्थेचे संचालक देवेंद्र गणवीर यांना दिली. त्यानंतर लगेच आशा हॉस्पिटल (कामठी) येथे महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शनिवारी (दि.१०) डॉ. बन्सोड यांनी भोजराजवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यासाठी भोजराजच्या येण्या-जाण्याची व्यवस्था संस्थेचे अध्यक्ष रवींद्र गणवीर यांनी केली. गरजू व पैशांअभावी आरोग्य विषयक सेवांपासून वंचित असलेल्या लोकांची माहिती संस्थेला देऊन इतरांची मदत करावी असे संस्थेचे संचालक देवेंद्र गणवीर यांनी कळविले आहे.
तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 4:23 AM