लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने कृषी कल्याण अभियान हाती घेण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागांनी जोमाने प्रयत्न करावेत, असे निर्देश नवी दिल्ली येथील धोरण विभागाच्या केंद्रीय सहसचिव डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी सर्व विभागांना दिले.येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी कल्याण अभियानांतर्गत शुक्रवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी प्रामुख्याने नागपूरचे विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.प्रज्ञा गोलघाटे उपस्थित होते. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे, पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा आयुक्त डॉ.वाय.एस.वंजारी, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ.प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, डॉ.विक्रम कदम, डॉ.ए.आर.पडोळ, पशुधन विकास अधिकारी डॉ.जी.एस.काटवे, प्रशांत ढवळे, किरण वझाडे, श्रीकांत कापगते, सचिन सातपुते, सतीश पुरकमवार, प्रतिभा चौधरी, डॉ.देवेंद्र मुनघाटे, केवळराम सालोटकर, राजेश वाणी, मंगेश चापले, संजय चौधरी, कोमेश रंधये आदी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी कृषी कल्याण अभियान भाग १ व २ चा संपूर्ण आढावा घेतला. आकांक्षित जिल्ह्यांतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रम, कृषीनिविष्टा, नाडेप पद्धती याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेतली. कृषी कल्याण अभियानांतर्गत राबविण्यात आलेले शेतकरी प्रशिक्षण, कृषीनिविष्टा वाटप, सर्वोत्कृष्ट लसीकरण, नाडेप पद्धती, ठिबक सिंचन यासाठी गडचिरोली जिल्ह्याला सातवा क्रमांक मिळाल्यामुळे त्यांनी सर्व विभागाचे कौतुक केले. तसेच कृषी कल्याण अभियानांतर्गत सर्व कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना केल्या.या बैठकीत कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कऱ्हाळे यांनी कृषी कल्याण अभियान भाग १ व भाग २ चे सादरीकण केले. कृषी कल्याण अभियानाची रूपरेषा उपस्थितांना सांगिंतली. आढावा बैठकीला कृषी विज्ञान केंद्र, आत्मा, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग व इतर विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी केंद्रीय सहसचिव डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतलागवड पद्धत व इतर बाबींची माहिती संबंधित विभाग प्रमुखांकडून जाणून घेतली.गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये शेती लागवड पद्धती, यांत्रिकीकरण, शेतीची उत्पादकता व इतर बाबींची जाणीव जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने २ आॅक्टोबर ते २५ डिसेंबर २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील २५ गावांमध्ये कृषी कल्याण अभियान भाग २ अंतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय सहसचिवांनी ही आढावा बैठक गडचिरोलीत घेतली.कार्यक्रमाचे संचालन ज्योती परसुटकर यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर ताथोड यांनी मानले.ठिबक सिंचन, पेरू पीक व गांढूळ खत प्रकल्पाला दिली भेटभारत सरकारच्या केंद्रीय सहसचिव डॉ.नमिता प्रियदर्शी यांनी गडचिरोली येथील मुक्त संचार गोठा प्रकल्प, नाडेप कम्पोस्ट युनिट, ठिबक सिंचन प्रकल्प, पेकल्पाच्या तंत्रज्ञानाविषयीची माहिती प्रियदर्शी यांनी जाणून घेतली. कृषी कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील गोगाव व सर्च येथे भेट देऊन तेथील माहिती जाणून घेतली. यावेळी गोगाव येथील शेतकऱ्यांना त्यांच्या रू पीक प्रात्यक्षिक प्रकल्प तसेच गांढूळ खताला भेटी देऊन याबाबतची माहिती जाणून घेतली. सदर प्रहस्ते कृषीनिविष्ठांचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत नागपूरच्या विभागीय कृषी अधिकारी डॉ.प्रज्ञा गोलघाटे उपस्थित होत्या. जिल्ह्यातील कृषी व आत्मा विभागाच्या अधिकाºयांकडून त्यांनी विविध प्रकल्पाची माहिती जाणून घेतली.
कृषी कल्याण अभियान यशस्वीपणे राबवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2018 1:15 AM