लोकमत न्यूज नेटवर्कसौंदड : सडक अर्जुनी तालुक्यामध्ये गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने रेती तस्करांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.महसूल विभागाकडून कारवाईच्या नावाखाली वाहन धारकांकडून एक हजार ५०० रूपयांचे दंड केला जातो. मात्र ही कारवाईसुद्धा केवळ मोजक्याच वाहनधारकांवर केली जाते.राजकीय वरदहस्त व अधिकाºयांच्या जवळील लोकांवर कारवाई केली जात नसल्याची ओरड परिसरामध्ये आहे. काही वाहनधारक याचा विरोध करीत असले तरी व्यवसाय चालविण्यासाठी त्यांना गप्प बसावे लागत आहे. सध्या पावसाने उसंत दिल्याने नदी घाटामध्ये रेतीचा उपसा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. सौंदड येथील चुलबंद नदीची रेती जिल्ह्यात दूरपर्यंत ट्रॅक्टर व ट्रकच्या सहाय्याने वाहतुक केली जाते.देवरी, ककोडी, नवेगावबांध, आमगाव, डव्वा, बोपाबोडी, गोरेगाव या मार्गे रेतीची वाहतूक केली जाते. सध्या तीन हजार रुपये ब्रास इतक्या किमतीने रेतीची विक्री केली जात आहे. महसूल विभागाने दंडात्मक कारवाई करुन शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडविणाºया चोरांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.
रेती तस्करांना सुगीचे दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 9:20 PM
सडक अर्जुनी तालुक्यामध्ये गौण खनिजांचे मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन सुरू आहे. गेल्या पंधरा वीस दिवसांपासून पाऊस न झाल्याने रेती तस्करांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे.
ठळक मुद्देपावसाने घेतली उसंत : गौण खनिजाचे अवैध उत्खनन