लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया:- नक्षलग्रस्त आणि आदिवासी क्षेत्रातील विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय भाषेतील दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि त्याच बरोबर नक्षलग्रस्त भागातील मराठी-छत्तीसगडी-हिंदी भाषिक विध्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय भाषेत निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना सदर संशोधन प्राचार्य डॉ. सुजित एच. टेटे यांनी सादर केलेला होता. सदर संशोधन अहवालाची स्तुती जागतिक स्तरावर करण्यात आलेली असून डॉ. सुजित टेटे यांच्या शिक्षणक्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन द्वारे जागतिक सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे.प्राचार्य डॉ सुजित टेटे मागील 10 वषार्पासून खाजगी शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अध्यापनाचे काम करीत असून देवरी येथिल लोकप्रिय ब्लॉसम पब्लिक स्कूल मधे कार्यरत आहेत. तसेच निरनिराळ्या शैक्षणिक संशोधनात भाग घेतलेला आहे.युएसओ चे सदस्यत्व, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणेचे सदस्यत्व, ऑल इंडिया टीचर वेल्फेयर असोसिएशनचे सदस्यत्व, पर्यावरण विषयक कायार्तील ग्रीन आर्मी चे सदस्यत्व, अर्थ फेडरेशनचे सदस्यत्व तसेच नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी केलेल्या प्रयत्नाची दखल घेत युनायटेड नॅशन वॅलनटीयर चे सदस्यत्व सुद्धा प्राप्त झालेले आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी काठमांडू येथील दीक्षांत समारंभात डॉक्टर ऑफ लिटरेचर ( डी.लिट. ) ही पदवी डॉ. सुजित टेटे यांना प्रदान करण्यात आलेली होती.डॉ.सुजित टेटे यांचे शिक्षण ग्रामीण भागात झालेले असून अत्यंत कमी वेळात शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीसाठी समाजातील प्रतिष्ठित नागरिक, कटुंबिय, मित्र परिवार, कार्यक्षेत्रातील सहकारी, तसेच सर्व क्षेत्रांतून अभिनंदन करण्यात येत आहे.
गोंदियाचे डॉ. सुजित टेटे जागतिक संविधान आणि संसद असोसिएशनच्या सदस्यपदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 10:38 AM
डॉ. सुजित टेटे यांच्या शिक्षणक्षेत्रातील सुप्त कामगिरीची दखल घेत जागतिक संविधान आणि संसद असोसिएशन द्वारे जागतिक सदस्यत्व नुकतेच प्रदान करण्यात आलेले आहे.
ठळक मुद्देशिक्षण क्षेत्रातील कामगिरीची जागतिक स्तरावर दखल