लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : पुन्हा एकदा जनशक्तीचा विजय झाला असून सुकडी-डाकराम येथील केंद्र क्रमांक ७७० पूर्ववत करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिले. आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नांचे हे फलीत असून नागरिकांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झाली.तालुक्यातील सुकडी (डाकराम) येथील परीक्षा केंद्र शिक्षण मंडळ नागपूर यांचे पत्र क्र. नाविम/गोस ३५२९ दि. २१ सप्टेंबर २०१८ नुसार परीक्षा केंद्र बंद करण्यात आले होते. त्यामुळे येथील परीक्षा केंद्र ठाणेगावला हलविण्यात आले होते. विद्यार्थ्यांची होत असलेली गैरसोय बघता विद्यार्थी, पालक व प्रतिष्ठित नागरिकांनी केंद्र पूर्ववत सुरु ठेवावे यासाठी तहसीलदारांमार्फत संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मात्र त्याच काहीच फायदा न निघाल्याने जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती मदन पटले यांच्या नेतृत्वात शनिवारी (दि.२) आमरण उपोषणाला सुरूवात करण्यात आली होती.या प्रकरणी सतत पाठपुरावा करीत आमदार विजय रहांगडाले यांनी संबंधितांना तत्काळ कार्यवाही करावी असे निर्देश दिले व बोर्डातून केंद्र पूर्ववत चालू ठेवण्याचे पत्र काढले. तसेच उपोषण स्थळाला भेट देवून त्यांना गोड बातमी देत उपोषण कर्त्यांना लिंबू पाणी पाजून उपोषणाची यशस्वी सांगता केली. आमदार रहांगडाले यांच्या प्रयत्नामुळे सुकडी येथील केंद्र क्रमांक ७७० पूर्ववत झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाल. विशेष म्हणजे, केंद्र पूर्ववत झाल्याने विद्यार्थ्यांना आता ठाणेगावला जावे लागणार नाही.२१ सप्टेंबर २०१८ चा आदेश रद्दसुकडी येथील केंद्र क्रमाक ७७० रद्द करण्याबाबत २१ सप्टेंबर २०१८ रोजी आदेश काढण्यात आले होते. त्यानुसार सुकडी येथील केंद्र करून ठाणेगावला हलविण्यात आले होते. मात्र आमदार रहांगडाले यांच्या प्रयत्नांनी विभागीय शिक्षण मंडळ नागपूर विभागीय अध्यक्ष रविकांत देशपांडे यांच्या स्वाक्षरीने पत्र काढून सुकडी- डाकचे परीक्षा केंद्र पूर्ववत सुरु ठेवून जुणे पत्र २१ सप्टेंबर १८ चे या पत्राद्वारे रद्द करण्यात आले आहे, असे या पत्रात नमूद केले आहे.
सुकडी-डाकरामचे केंद्र क्रमांक ७७० पूर्ववत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2019 9:42 PM
पुन्हा एकदा जनशक्तीचा विजय झाला असून सुकडी-डाकराम येथील केंद्र क्रमांक ७७० पूर्ववत करण्याचे आदेश नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रविकांत देशपांडे यांनी दिले. आमदार विजय रहांगडाले यांच्या प्रयत्नांचे हे फलीत असून नागरिकांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता झाली.
ठळक मुद्देजनशक्तीचा विजय : आमदार रहांगडाले यांच्या प्रयत्नांचे फलीत