गोंदिया : शनिवारी (दि. २०) जिल्ह्यात पाच रुग्णांची भर, तर मात करणारे पाच अशी ‘इक्वल-इक्वल’ आकडेवारी आली होती. तर सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (दि.२१) जिल्हयात ६ बाधितांची भर पडली असून ६ रूग्णांनी कोरोनावर मात केल्याने पुन्हा ‘इक्वल-इक्वल’ आकडेवारी दिसून आली. मात्र रविवारी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील मृतांची संख्या १८५ झाली आहे. आता बाधितांची संख्या १४३२५ झाली असून यातील १४०८५ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने जिल्ह्यात आता ५५ क्रियाशील रुग्ण उरले आहेत.
राज्यात कोरोनाचा उद्रेक वाढत असल्याने सर्वत्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असला तरीही मागील काही दिवसांपासून बाधित व मात करणाऱ्यांच्या आकडेवारीतील फरक आता कमी होत असल्याचे दिसत आहे. शिवाय मृतांचा आकडाही वाढत असल्याने ही बाब धोकादायक वाटू लागली आहे. असे असतानाच रविवारी जिल्ह्यात पाच नवीन बाधितांची भर पडली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील पाच, तर इतर जिल्हा व राज्यातील एक रुग्ण आहे. तसेचसहा रुग्णांनी कोरोनावर मात केली असून हे सर्व रुग्ण गोंदिया तालुक्यातीलच आहेत.
यानंतर आता जिल्ह्यात ५५ क्रियाशील रुग्ण असून यामध्ये गोंदिया तालुक्यातील ४५, गोरेगाव दोन, सालेकसा दाोन, अर्जुनी-मोरगाव पाच, तर इतर राज्य व जिल्हयातील एक रुग्ण आहे.
या क्रियाशील ५५ रुग्णांमधील ३० रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. तालुकानिहाय बघितल्यास यामध्ये गोंदिया तालुक्यातील २६, गोरेगाव एक, सालेकसा एक, तर अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील दोन रुग्ण आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील आकडेवारी बघता जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.२ टक्के असून द्विगुणित गती ३८०.२ दिवस नोंदविण्यात आली आहे.
-------------------------
जिल्ह्यात मृतांची संख्या वाढतीच
जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असल्याचे बोलले जात असले तरीही मृतांची वाढती संख्या चिंताजनक बाब आहे. रविवारी जिल्ह्यात आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाला असून त्यानंतर एकूण संख्या १८५ झाली आहे. यामध्ये गोंदिया तालुक्यातील १०३, तिरोडा २४, गोरेगाव ६, आमगाव १३, सालेकसा ३, देवरी १०, सडक-अर्जुनी ५, अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील ११ तर इतर राज्य व जिल्हयातील १० रुग्ण आहेत. जिल्ह्यात मृत्युदर १.२० टक्के नोंदला गेला आहे.
---------------------------
जिल्ह्यात १३६६५४ चाचण्या
जिल्ह्यात आतापर्यंत १३६६५४ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये ६८९८८ आरटी-पीसीआर चाचण्या असून त्यांतील ८४५७ पॉझिटिव्ह, तर ५७२५२ निगेटिव्ह आल्या आहेत. तसेच ६७६५४ चाचण्या रॅपिड ॲंटिजेन असून यांतील ६१६१ पॉझिटिव्ह, तर ६१४९३ निगेटिव्ह आल्या आहेत.