शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
4
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
7
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
8
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
9
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
10
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
11
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
12
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
13
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
14
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
15
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
16
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
17
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
18
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
19
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
20
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई

सिंचनाला मिळणार आधार

By admin | Published: August 04, 2016 12:09 AM

राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सन २०१५-१६ या वर्षापासून ...

गंगाझरीत जलयुक्तचे वरदान : नाला व सिमेंट नाला परिसरातील शेतकरी सुखावले गोंदिया : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य शासन सन २०१५-१६ या वर्षापासून जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम राबवित आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यात जलसंधारणाची व शाश्वत सिंचनाची अनेक कामे करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांसाठी तर जलयुक्त शिवार अभियान हे वरदान ठरले आहे. गोंदिया तालुक्यातील गोंदिया-तिरोडा मार्गावर असलेले गंगाझरी हे गाव. कृषि विभागाने गंगाझरीच्या परिसरात असलेल्या नाल्यांवर जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट नाला बंधाऱ्याची दुरूस्ती केली. नाला खोलीकरणाचे कामदेखील केले. या दुरु स्तीच्या कामांमुळे पावसाचे पाणी बंधाऱ्यात साठवू लागले तर नाला खोलीकरणाच्या कामामुळे नाल्यातील सुपीक गाळ शेतकऱ्यांच्या शेतात टाकण्यात आला. नाल्यात पाण्याची साठवणूक मोठ्या प्रमाणात होवू लागली. बंधाऱ्यात पाणी अडवून शेतकऱ्यांना धान पिकाच्या सिंचनासाठी मदत होवू लागली. कधी एका पाण्याच्या कमतरतेमुळे उत्पादनात होणारी घट आता पाण्याच्या उपलब्धतेमुळे आणि नाल्यातील गाळ शेतीत टाकण्यात आल्यामुळे उत्पादनात वाढ होण्यास मदत झाली आहे. जलयुक्त शिवार अभियानातून सिमेंट नाला दुरु स्ती आणि नाला खोलीकरणाची कामे करण्यात आली. नाला खोलीकरण करण्यात आल्यामुळे नाल्यात दूरपर्यंत पाण्याची साठवणूक आणि सिमेंट नाला दुरूस्तीमुळे पाण्याची अडवणूक करता येणे शक्य झाल्याचे गोंदिया पंचायत समितीचे सदस्य प्रकाश पटले यांनी सांगितले. या कामातून पाण्याची गरज पूर्ण होण्यास मदत झाली. नाला परिसरातील आणि सिमेंट नाला बंधारा परिसरात भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाल्याचेही पटले यांनी सांगितले. जलयुक्त शिवार अभियानातून गंगाझरीजवळील नाला खोलीकरणाचे काम करण्यात आले. याच नाल्यावर असलेल्या सिमेंट नाला बंधाऱ्याच्या दुरु स्तीचे काम तसेच बोडी खोलीकरणाच्या कामामुळे पाण्याची साठवणूक, पाण्याची अडवणूक करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप, रबी व उन्हाळी हंगामात घेण्यात येणाऱ्या पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली. गंगाझरीतील वाहितीखाली असलेल्या २९३.९३ हेक्टर शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले. या शेतीला ७६१.४१ टीसीएम पाण्याची आवश्यकता असताना जुन्या कामामुळे ५३७.८३ टीसीएम पाणी साठविण्यात आले व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामामुळे २२९.८५ टीसीएम पाणी साठविण्यात आले. गंगाझरीच्या परिसरात जलयुक्त शिवार अभियानातून बोडी खोलीकरणाची कामे, सिमेंट नाला बंधाऱ्याची दुरु स्ती आणि नाला खोलीकरणाच्या कामामुळे २२९.८५ टीसीएम पाण्याची साठवणूक करण्यात आली. जुन्या कामामुळे व जलयुक्त शिवार अभियानांतर्गत करण्यात आलेल्या कामातून २६७.४१ टीसीएम पाण्याची साठवणूक झाली आहे. या पाण्याच्या उपलब्धतेमुळे तर नाला व सिमेंट नाला बंधारा परिसरातील शेतकरी तर सुखावलेच सोबत वन्य व पाळीव प्राण्यांनादेखील पाण्याची मुबलक उपलब्धता झाली आहे. (प्रतिनिधी)