शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
2
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
3
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
4
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
5
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
6
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
7
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
8
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
9
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
10
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
11
Suzlon Energy च्या शेअर्समध्ये घसरण, ब्रोकरेजनं कमी केलं रेटिंग; नवं टार्गेट किती?
12
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
13
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
14
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
15
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
16
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा
17
IND vs BAN : बांगलादेशचा 'टायगर' जखमी! जबरा फॅनला मारहाण; रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
18
KRN Heat Exchanger IPO : ग्रे मार्केटमध्ये 'हा' शेअर सुस्साट.. ₹२२० चा शेअर GMP ₹२७४ वर; तुम्ही केलंय का अप्लाय? 
19
देशाला पुढे घेऊन जाणारा प्रभावशाली नेता कोण? सैफ अली खानने घेतलं 'या' राजकीय व्यक्तीचं नाव
20
इराणी व्यक्तीची माहिती देणाऱ्याला अमेरिकेकडून १६७ कोटींचे बक्षीस, आरोपी कोण? गुन्हा काय?

दुग्धवाढीसाठी सहकार्य करणार

By admin | Published: July 01, 2017 12:19 AM

शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे.

महादेव जानकर : देवलगाव येथे पशुपालकांसाठी कृती शिबीर लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळले पाहिजे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा महत्त्वाचा ठरणार आहे. पशुपालकांनी दुधाळ जनावरांचे शास्त्रोक्त पद्धतीने संगोपन करावे. पशुपालकांना दुग्धवाढीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार, असे प्रतिपादन पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केले. गुरूवारी (दि.२९) अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देवलगाव येथे राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाअंतर्गत आयोजित कृती शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री राजकुमार बडोले होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, दुग्धविकास विभागाचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ.वाणी, जिल्हा उपायुक्त शहारे, गटविकास अधिकारी नारायण जमईवार, सरपंच कामदेव कापगते उपस्थित होते. पुढे बोलताना नामदार जानकर यांनी, १ ते ७ जुलै दरम्यान राज्यात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी-कर्मचारी गावोगावी जाऊन पशुपालकांना दुग्धवाढीसाठी मार्गदर्शन व मदत करणार आहेत. या योजनेमुळे निश्चितच दुग्धवाढीसाठी मदत होईल. विदर्भ आणि मराठवाड्यात दुधाचा महापूर आणण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांना आत्महत्यापासून परावृत्त करण्यासाठी हा प्रकल्प उपयोगी ठरणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्यात येतील असे सांगून त्यांनी, चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना आपले प्रोत्साहन राहणार आहे. पाळीव जनावरांसाठी सुध्दा अ‍ॅम्बुलन्स सेवा सुरु करण्यात येईल. त्यामुळे आजारी दुधाळ जनावराला वेळीच उपचार करता येईल. राज्यात अशाप्रकारे २९८ अ‍ॅम्बुलन्स सुरु करण्यात येणार आहे. दुग्धव्यवसाय हा एटीएम आहे. या व्यवसायामुळे पैसा हाती खेळत असतो. जिल्ह्यात मत्स्य विकासाला सुध्दा चालना देण्यात येईल. जिल्ह्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांनी योजनांचा केवळ अनुदानासाठी लाभ न घेता त्या योजना प्रभावीपणे राबविल्यास जीवनमान उंचावण्यास मदत होईल. ओबीसी बांधवांसाठी सुध्दा या योजनांचा लाभ देण्यात येईल असे सांगितले. पालकमंत्री बडोले यांनी, दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा खेळता राहील. जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरली जाणार आहे. जिल्ह्यात दुधाचे उत्पादन कमी आहे. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाची निवड केल्यास चांगले दिवस येण्यास मदत होईल. देवलगाव या गावाची निवड दुग्धवाढीसाठी पथदर्शी प्रकल्पात करण्यात आली आहे. दुग्ध व्यवसायाला जिल्ह्यात चालना मिळण्यास हा प्रकल्प उपयुक्त ठरणार असून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून देखील दुग्धवाढीसाठी जास्तीत जास्त निधी देण्यात येईल असे सांगितले. प्रास्ताविक जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.शहारे यांनी मांडले. कार्यक्रमाला पशुसंवर्धन विभागाचे तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ.गोंडाणे, डॉ.पटले यांच्यासह त्यांच्या विभागाचे अधिकारी-कर्मचारी तसेच देवलगाव येथील ग्रामस्थ व पशुपालक मोठ्या संख्येत उपस्थित होते. स्टॉल्सला भेट व वृक्षारोपण जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चालना व दुग्ध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ आनंद यांचेमार्फत जिल्ह्यातील आठ तालुक्यातील प्रत्येकी ८ गाव असे एकूण ६४ गावांमध्ये प्रकल्प राबविण्यात येणार आहे. राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळाने निवड केलेल्या देवलगाव येथे या कार्यमोहीम शिबिराचा शुभारंभ दुग्धविकास मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पाहुण्यांनी दुधाळ जनावरांची पाहणी करु न पशुसंवर्धन विभागाने लावलेल्या स्टॉलला भेट देवून माहिती जाणून घेतली. तसेच त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.