राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानांतर्गत ० ते १८ वयोगटातील रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येते राष्ट्रीय बाल स्वास्थ्य चमूद्वारे दुर्धर रोगाने ग्रस्त रुग्णांचा तपासणी द्वारे शोध घेतला जातो. या रुग्णांची आणि कुटुंबीयांचे समुपदेशन करण्यात येते. तालुक्यात ९ लाभार्थी हृदयरोगाने पीडित तर एक रेक्टल ऍट्रेझिया रोगांनी पीडित होता. या लाभार्थ्यांना पैकी ८ लाभार्थ्यांवर आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. तालुक्यातील राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधा रहेले, वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक हेमने, परिचारिका स्वाती कळमकर, औषधी निर्माता वैशाली दोनाडकर आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक संजय बिसेन यांनी सहकार्य केले.
180921\1834-img-20210918-wa0035.jpg
पालकांसोबत शस्त्रक्रिया झालेले बालक