लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीन होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादेव मांडोबाई हे नाव देण्यात आले. असा जुना इतिहास आहे.सूर्यादेव मांडोबाई देवस्थानाविषयी लोकांची आस्था असून इथे चैत्र नवरात्र, मकरसंक्रात व महाशिवरात्रीला यात्रा भरते. सूर्यादेव मांडोबाई यात्रेची ख्याती महाराष्ट्रात सर्वदूर पसरलेली असून महाराष्टÑाच्या कानाकोपऱ्यातून भाविक आपली उपस्थिती लावतात. गोरेगाव तालुक्यात पाऊल पडली म्हणजे. पर्यटक व श्रद्धाळू या स्थळाचे दर्शन घेतल्याशिवाय राहत नाही. या पर्यटन स्थळात दरवर्षी सर्वधर्मिय विवाह सोहळे आयोजित केले जातात. या माध्यमातून सर्वधर्मिय समभाव ही भावना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम येथील लोकप्रतिनिधी, श्रद्धाळू, नागरिक करीत असतात. सूर्यादेव मांडोबाई देवस्थानाला सुविधा उपलब्ध करण्यासाठी परिसरातील नागरिक नेहमीच झटताना दिसतात. मांडोबाई देवस्थानाचे सचिव विनोद अग्रवाल यांनी आपल्या अथक परिश्रमातून या क्षेत्राला पर्यटनदृष्ट्या परिपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.मांडोबाई देवस्थानामुळे नवरात्री उत्सवा दरम्यान दररोज येथे १० हजाराहून अधिक भाविक दर्शनासाठी येतात. देवस्थान समितीतर्फे येथे नऊ दिवस विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. परिसरातील एक जागृत देवस्थान म्हणून मांडोबाई देवस्थान ओळखले जाते.निसर्गाच्या सानिध्यात मांडोबाई देवस्थान वसलेले असल्यामुळे निसर्गप्रेमीही निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येथे तासंतास विरंगुळा घालत असतात. येथे ४० हून अधिक दुकाने सजलेली असून ४० कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो. येथील दिवसभराच्या गर्दीमुळे येथील वातावरणाला नेहमीच जत्रेची झालर लागलेली असते. मांडोबाई देवस्थानातील विविध झाडांमुळे व त्या झाडांना दिलेल्या शोभनिय आकारामुळे या देवस्थानाचे चित्र मोहक दिसते. विविध ठिकाणी असलेली सजावट मनमोहून घेणारी आहे. नवरात्रोत्सवादरम्यान या निसर्गरम्य देवस्थानामध्ये भाविकांची अलोट गर्दी राहते. विविध राज्यातील नागरिक येथे दर्शनासाठी येतात. या देवस्थानाची विदर्भात सर्वदूर ख्याती आहे.
निसर्गाचं लेणं सूर्यादेव मांडोबाई देवस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:47 PM
निसर्गरम्य पार्श्वभूमी लाभलेले सूर्यादेव मांडोबाई देवस्थान गोरेगाव पासून अवघ्या २५ किलोमिटरवर वसलेले आहे. सूर्या आणि देव हे दोन भाऊ या पर्यटनस्थळात अनाधिकाळापासून वास्तव्यास होते. या दोन भावाला मांडोबाई नामक बहीन होती. या तिघांच्या नावावरुनच सूर्यादेव मांडोबाई हे नाव देण्यात आले. असा जुना इतिहास आहे.
ठळक मुद्देनवरात्रोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन : विविध राज्यातील भाविकांची उपस्थिती