लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शनिवारी (दि.२) तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. दरम्यान कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर ठाकरे यांनी निलंबनाची कारवाई केली. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.प्राप्त माहितीनुसार गोंदिया जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी ठाकरे यांनी शनिवारी सकाळी अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या बोंडगाव-सुरबन येथे शेअरिंग शौचालय असलेल्या लाभार्थ्यांच्या येथे गृहभेटीसाठी आले होते. सकाळी ५ वाजता स्थानिक पंचायत समितीच्या गुडमार्निग पथकाद्वारे गावातील उघड्यावर शौचास जाणाºया लोकांना शौचालयाचा वापर करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.यानंतर त्यांनी सकाळी ९ वाजता प्रा. आर. केंद्र गोठणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी केवळ दोन शिपाई उपस्थित होते. आरोग्य सहाय्यक आर.एस. राऊत व एस.बी. जवंजाळ यांना त्यांचे कर्तव्य व जवाबदारी बाबत विचारणा केली असता खोटे बोलून त्यांचे दैनंदिन कामाची वेळ सकाळी ८ वाजताची असताना जाणीवपूर्वक सकाळी ९.३० वाजता असल्याचे सांगून वरिष्ठांची व शासनाची दिशाभूल केली. त्यामुळे ते महाराष्टÑ जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (वर्तणूक) निगम १९६७ मधील तरतुदीनुसार वर्तणूक नियमाचे भंग केल्याने शिस्तभंगाच्या कार्यवाहीस पात्र ठरले.या दोन्ही आरोग्य सेवकांना तत्काळ निलंबित करण्याचे निर्देश सीईओ ठाकरे यांनी दिले. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सालेकसा येथे देण्यात आले. दरम्यान सीईओंच्या या धडक कारवाईमुळे लेटलतीफ कर्मचाºयांचे मात्र धाबे दणाणले आहे. मात्र कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी आहे.आता टार्गेट विदर्भवीरहावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. या स्थानकावरुन दररोज शंभरावर प्रवाशी गाड्या धावातात. शिवाय या गाड्यांच्या वेळासुध्दा कर्मचाºयांना सुटेबल आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच विभागाचे कर्मचारी मुख्यालयी न राहता नागपुरपासून अप-डाऊन करतात. यात सर्वाधिक कर्मचारी विदर्भ एक्सप्रेसने ये-जा करतात. सोमवारपासून कार्यालयीन वेळेत उपस्थित न राहणाºया कर्मचाºयांवर कारवाई केली जाणार असल्याचे सीईओ ठाकरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन कपातवैद्यकीय अधिकारी डॉ. आशिष बोदेले हे मुख्यालयी व गोठणगाव येथे वास्तव्याने राहत नाही. डॉ. एस. डी. खोब्रागडे हे सुद्धा मुख्यालयी राहत नाही. भेटीत दोघेही गैरहजर असल्याचे दिसून आले. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी २७ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत हजेरी पटावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे या कालावधीची बिना वेतन रजा मंजूर करण्याचा शेरा हजेरी पटावर सीईओ ठाकरे यांनी नोंदविला आहे.वरिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्याचे निर्देशगोठणगाव येथील प्रा.आ.केंद्रात दोन प्रसुतीचे रुग्ण दाखल असताना एकही आरोग्य कर्मचारी, परिचारिका व वैद्यकीय अधिकारी वास्तव्याने मुख्यालयी राहत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून गैरवर्तणुकीची आहे. नियमानुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना ते राहत नाही. तसेच घरभाडे भत्ता व नक्षलभत्याची उचल केली जाते ही बाब गैरशिस्तीची आहे. सर्व कर्मचाऱ्यांचे हे भत्ते कपात करावे व शिस्तभंगाची कारवाई करावी असे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाºयांना देण्यात आले आहेत. कर्मचाºयांना मंजूर करण्यात आलेली वरिष्ठ वेतनश्रेणी रद्द करण्याचे ही निर्देश सीईओ ठाकरे यांनी दिले आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राविषयीची तक्रार जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले व जि.प. उपाध्यक्षा रचना गहाणे यांना केली होती असे समजते.
दोन लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 12:03 AM
गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी शनिवारी (दि.२) तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाºया गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला आकस्मिक भेट दिली. दरम्यान कार्यालयीन वेळेत अनुपस्थित असलेल्या दोन कर्मचाऱ्यांवर ठाकरे यांनी निलंबनाची कारवाई केली.
ठळक मुद्देदुर्गम भागात सीईओंची आकस्मिक भेट : कर्मचाºयांमध्ये दहशत, मोहिमेत सातत्य ठेवा